गरिबीचा सामना करत श्रीमंतीची 'किक' मारणारे अवलिया! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Neymar  And Cristiano Ronaldo

गरिबीचा सामना करत श्रीमंतीची 'किक' मारणारे अवलिया!

Cristiano Ronaldo and Neymar birthday: जगभरातील प्रसिद्ध फुटबॉलपटूंच्या यादीत ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेयमार या दोघांचाही आज वाढदिवस. सोशल मीडियावर दोन्ही दिग्गजांवर शुभेच्छांचा वर्षावर होताना दिसत आहे.. ट्विटरवर सध्या #CristianoRonaldo #Neymar ट्रेंडमध्ये आहेत. सध्याच्या घडीला फुटबॉलमध्ये हे दोन्ही गडी आघाडीच्या खेळाडूंमध्ये आहेत. 1985 मध्ये रोनाल्डोचा जन्म झाला तर याच दिवशी 1992 मध्ये नेयमार ज्यूनियर या जगात अवतरला. दोन्ही खेळाडूंची घरची परिस्थिती बेताची होती. यातून मार्ग काढत त्यांनी जगात आपला दबदबा निर्माण केला आहे.

रोनाल्डोचे (Cristiano Ronaldo) वडील माळी होते. त्याची आई चार घरात स्वयंपाक करायला जायची. चार भावा-बहिणींसोबत रोनाल्डो एका छोट्याशा पत्र्याच्या घरात रहायचा. आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्याच्या कुटुंबियांनी त्याला शाळेत धाडले. इथूनच त्याच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. वयाच्या आठव्या वर्षी त्याने क्लबकडून खेळायस सुरुवात केली. त्याच्या कामगिरीनं 17 वर्षाखालील संघात त्याची वर्णी लागली. रोनाल्डोने 18 व्या वर्षी इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडने 17 मिलियन अमेरिकी डॉलरला करारबद्ध केले. अनेक वर्षे स्पेन फुटबॉल क्लब रियल मॅद्रिद संघाकडून खेळताना दिसला. फ्रेंच फुटबॉल क्लबच्या PSG कडून खेळल्यानंतर रोनाल्डो पुन्हा क्लब मँचेस्टर युनायटेडकडून खेळताना दिसतोय.

हेही वाचा: U19 WC Final : टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार?; मॅच कुठे पाहाल?

दुसरीकडे ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेयमारची (neymar) कहाणी अशीच आहे. नेयमारचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. तो एका झोपडपट्टीत राहायचा. त्याचे वडील एक चांगले फुटबॉलपटू होते. पण त्यांना परिस्थितीमुळे खेळाला वेळ देता आला नाही. घर चालवण्यासाठी ते एकाच वेळी अनेक ठिकाणी काम करत. वीज बिल भरायला पैसे नसल्यामुळे नेयमारच्या कुटुंबियांने अनेक दिवस अंधारातही काढले आहेत. नेयमारने या संघर्षातूनही आपल्या यशाचा मार्ग शोधला. स्ट्रीट फुटबॉलर रूपात त्याने खेळायला सुरुवात केली. वयाच्या 11 व्या वर्षी नेयमारने ब्राधीलमधील प्रसिद्ध एफसी सेंटोस क्लब ज्वॉइन केला. 2017 मध्ये नेयमारने जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ठरला होता.

Web Title: Football Latest News Cristiano Ronaldo And Neymar Birthday You Know Success Story Of Both Footballer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..