

Lionel Messi
sakal
नवी दिल्ली : अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याची सांगता नवी दिल्लीत झाली. भारतामध्ये मिळालेल्या अफाट प्रेमामुळे लियोनेल मेस्सी भारावून गेला. भारत सोडताना त्याच्या मुखातून आपसूकच निघाले की, तुमच्याकडून मिळालेले प्रेम कायम सोबत राहील. यापुढे एखादा सामना खेळण्यासाठी किंवा अन्य कोणत्या तरी कारणासाठी नक्कीच भारतात येईन. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.