लैंगिक शोषण प्रकरणात Aaron Summers ला चार वर्षांचा तुरुंगवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaron Summers  4 year Jail

‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ प्रकरणात ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला 4 वर्षांचा तुरुंगवास

Australian Cricketer Aaron Summers 4 year Jail : कधी बॉल टेम्परिंग तर कधी अश्लील फोटो शेअर करण्याच्या आरोपामुळ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे पाहायला मिळाले आहे. आता अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एरॉन समर्स (Aaron Summers) गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होता. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात एरॉन समर्स (Aaron Summers Jailed) याला दोषी ठरवण्यात आले असून त्याला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या युवा क्रिकेटरवर काही महिन्यांपूर्वी लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप झाले होते. याशिवाय त्याच्या लहान मुलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो ठेवण्याचा गंभीर आरोप होता. 17 मे रोजी या प्रकरणात त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासातून तो अखेर दोषी आढळला असून त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

हेही वाचा: दुर्गा मूर्तीची तोडफोड; पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश म्हणाला...

एरॉन समर्स (Aaron Summers) च्या मोबाईल फोनमध्ये लहान मुलांच्या लैंगिक शोषणासंदर्भातील व्हिडिओ आणि 10 मुलांच्या संपर्कात असल्याचा पुरावा मिळाला होता. या मुलांकडेही त्याने अश्लील फोटो आणि व्हिडिओ मागण्याचा प्रयत्न झाला होता. क्रिकेटर विरोधातील आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने त्याला कठोर आणि मोठी शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा: गांगुलीने 'बायको आणि गर्लफ्रेंड' वक्तव्य करुन घेतला वाद ओढवून

अबू धाबी टी10 लीगमध्ये तो डेक्कन ग्लेडियटर्स टीमकडून खेळला आहे. एरॉन समर्ससंदर्भात (Aaron Summers) न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. यात त्याला 3 वर्षे 11 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. पहिले दोन वर्षे त्याला पॅरोलवर तुरुंगाबाहेरही पडता येणार नाही, असेही न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले आहे.

Web Title: Former Australian Cricketer Aaron Summers Year Jailed For Possessing Explicit Content Of Children

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..