ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल स्लेटरला अटक

Michael Slater
Michael Slateresakal
Updated on
Summary

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल स्लेटरला (Michael Slater) घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय.

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल स्लेटरला (Michael Slater) घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. 51 वर्षीय स्लेटरला न्यू साउथ वेल्स पोलिसांनी (New South Wales Police) सिडनीच्या समुद्रकिनाऱ्यावर ताब्यात घेतलं असून कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपावरून पोलिसांनी ही कारवाई केलीय. स्लेटर सध्या ऑस्ट्रेलियाच्या टेलिव्हिजन शोमध्ये काम करत होता.

दरम्यान, 12 ऑक्टोबर रोजी घरगुती हिंसाचाराशी संबंधित स्लेटरविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मायकेल स्लेटरची पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली. अधिकारी सकाळी 9.20 वाजता स्लेटरच्या घरी पोहोचले आणि त्यांनी चौकशी सुरु केली. तद्नंतर स्लेटरला अटक करण्याचा निर्णय घेतला. अटकेनंतर स्लेटरला मुख्य पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.

Michael Slater
T 20 WC मधील बेस्ट जर्सी अन् 12 वर्षांच्या डिझायनरची चर्चा

स्लेटर हा ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या अव्वल खेळाडूंपैकी एक आहे. 2004 मध्ये निवृत्ती घेण्यापूर्वी त्यानं 5312 धावा केल्या. मात्र, या प्रकरणी ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलंय, की प्रसिद्ध टेलिव्हिजनच्या आणखी एकाला गेल्या आठवड्यात घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

Michael Slater
Team India चे 'हे' दोन प्रशिक्षक पुन्हा करु शकणार नाहीत अर्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com