South Africa : भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूचं दक्षिण आफ्रिकेत निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hoosain Ayob

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं शनिवारी ट्विट करून अयूब यांच्या मृत्यूची माहिती दिलीय.

South Africa : भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूचं दक्षिण आफ्रिकेत निधन

वर्णभेदामुळं दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासात मोठी उलथापालथ झाली. त्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर देशावर बहिष्कार टाकण्यात आला होता आणि दक्षिण आफ्रिकेलाही क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्याची परवानगी नव्हती, त्यामुळं अनेक उत्कृष्ट खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपापल्या खेळात यशाची चव चाखता आली नाहीय. क्रिकेटही त्याला अपवाद नव्हतं आणि असाच एक क्रिकेटपटू होता हुसेन अयूब (Hoosain Ayob)! भारतीय वंशाचा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू (South African Cricketer) अयूब हा वेगवान गोलंदाज होता, पण तो कधीही आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करू शकला नाही. आता वयाच्या 81 व्या वर्षी या दिग्गज वेगवान गोलंदाजाचं निधन झालंय. आज (शनिवार) 7 मे रोजी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं (Cricket South Africa) त्यांच्या मृत्यूची माहिती दिलीय.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं शनिवारी ट्विट करून अयूब यांच्या मृत्यूची माहिती दिली आणि शोक व्यक्त केला. आपल्या शोकसंदेशात आफ्रिकन बोर्डानं लिहिलंय, 'SACBOC (साउथ आफ्रिकन बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट) चे दिग्गज हुसेन अयूब यांचं निधन झाल्याचं जाणून CSA ला खूप दुःख झालंय. हुसैन यांना निःस्वार्थपणे क्रिकेटची सेवा करण्याची परवानगी दिल्याबद्दल आम्ही अयूब कुटुंबाप्रती संवेदना आणि कृतज्ञता व्यक्त करतो, असं त्यांनी नमूद केलंय.

हेही वाचा: भाजप नेते तजिंदर पाल सिंह बग्गांच्या अडचणीत वाढ, कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

हुसेन अयुब हे दीर्घकाळ आजारी होते आणि ते दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ इथं होते. किडनीच्या आजाराशी झुंज देत असताना शनिवारी दक्षिण आफ्रिकेतील त्याच शहरात त्यांचं निधन झालं. वेगवान गोलंदाजाला जीवनात वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला, ज्याचा त्यांनी 2020 मधील क्रॉसिंग बाउंड्रीज या पुस्तकात उल्लेख केलाय.

Web Title: Former Cricketer Hoosain Ayob Passes Away Age 81 Years Old Indian Origin South African Fast Bowler Port Elizabeth

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top