कपिलदेव यांचा दोन्ही पदांचा राजिनामा 

वृत्तसंस्था
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

परस्पर हितसंबंधाचा आरोप झाल्यानंतर कपिलदेव यांनी "बीसीसीआय'च्या प्रशासक समितीने नियुक्त केलेल्या क्रिकेट सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा आणि क्रिकेटपटू संघटनेच्या संचालकपदाचा राजिनामा दिला. 

नवी दिल्ली - परस्पर हितसंबंधाचा आरोप झाल्यानंतर कपिलदेव यांनी "बीसीसीआय'च्या प्रशासक समितीने नियुक्त केलेल्या क्रिकेट सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा आणि क्रिकेटपटू संघटनेच्या संचालकपदाचा राजिनामा दिला. 

परस्पर हितसंबंध आणि क्रिकेटपटू हा आता भारतीय क्रिकेटमध्ये चर्चेचा स्वतंत्र विषय बनून राहिला आहे. लोकपाल डी. के. जैन यांनी गेल्याच आठवड्यात परस्पर हितसंबंधाच्या मुद्यावरूनच क्रिकेट सल्लागार समितीच्या कपिलदेव, अंशुमन गायकवाड, शांता रंगास्वामी या तीनही सदस्यांना नोटिस बजावली होती. 

त्या वेळी सर्वात प्रथम शांता रंगास्वा सामी यांनी आपल्या पदाचा त्याग केला. आता कपिलदेव यांनी तोच मार्ग अवलंबला. 

सल्लागार समितीच्या आस्तित्वावरून प्रशासक समितीतच भेदभाव असल्याचे चित्र आहे. एक सदस्या डायाना एडल्जी यांनी जैन यांच्या निर्मयाचे स्मर्थन केले, तर अन्य दोन सदस्य अध्यक्ष विनोद राय आणि सदस्य रवी थोडगे यांनी विरोध केला होता. प्रशासक समिती किंवा "बीसीसीआय' यांनी कपिलदेव यांच्या राजिनाम्याला दुजोरा दिला नसला, तरी कपिलदेव यांना आपला राजिनामा संबंधित अधिकाऱ्यांकडे दिला असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. 

या संदर्भात वृत्तसंस्थेशी बोलताना कपिलदेव म्हणाले,""संघटनेच्या कामकाजावर लोकांचे लक्ष आहे आणि ते तक्रार करत आहेत हे चांगले आहे. पण, जर प्रत्येक तक्रारीची दखल लोकपाल जैन अशीच घेणार असतील, तर क्रिकेटपटूला क्रिकेट प्रशासनात उतरणे कठिण होईल.'' 

कपिलदेव यांनी या वेळी आपल्या राजिनाम्याचे वृत्त खरे असल्याचे सांगितले. ते म्हणाले,""मी सल्लागार आणि क्रिकेटपटू संघटना संचालक अशा दोन्हीचा राजिनामा संबंधित व्यक्तींना बुधावरीच मेल केल आहे. जैन एखाद्या वैयक्तिक तक्रारीवर अशा प्रकारे काम करणार असतील, तर आपल्याला काम करण्यात रस नाही. नव्या समितीची नियुक्ती होईल, तेव्हा नियुक्ती करण्यापूर्वी त्यांना परस्पर हितसंबंधाचा नियम समजावून सांगावा आणि त्याची पडताळणी करून घ्यावी. त्यानंतर क्रिकेटपटूची पात्रता लक्षात घेऊनच त्यांचा विविध समितीत समावेश करावा.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former India captain Kapil Dev resigns as Cricket Advisory Committee chairman