बांगर यांची गच्छंती निश्चित; 'हा' माजी सलामीवीर होणार भारताचा बॅटींग कोच?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची जवळजवळ गच्छंती निश्चित झाली आहे. त्यांच्याजागी आता भारताचे माजी सलामीवीर विक्रम राठोड यांची पर्वणी लागण्याची शक्यता आहे. 

मुंबई : भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची जवळजवळ गच्छंती निश्चित झाली आहे. त्यांच्याजागी आता भारताचे माजी सलामीवीर विक्रम राठोड यांची पर्वणी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी सल्लागार किंवा भारत अ संघाचे प्रशिक्षक या दोन पदांसाठी त्यांचे नाव गेले अनेक दिवस चर्चेत आहे. 

राठोड यांनी भारताकडून सहा कसोटी आणि सात एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 146 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 11,473 धावा केल्या आहेत. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब आणि हिमाचल प्रदेश या संघाचे प्रशिक्षकपद भूषविले आहे.

आता तरी विराटचे लाड थांबविणार की आज पुन्हा शास्त्रीच?

राठोड 2012-2016 या कालावधीमध्ये भारतीय संघाच्या निवड समितीचे सदस्य होते. एकीकडे संजय बांगर यांची गच्छंती जवळपास निश्चित झाली आहे तर दुसरीकडे रवी शास्त्री आणि भारत अरुण यांना पुन्हा करारबद्ध केले जाण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former India Opener Vikram Rathour Favourite For Batting Coach Job