

Shikhar Dhawan marries Sophie Shine
ESakal
माजी भारतीय फलंदाज शिखर धवनने वयाच्या ४० व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. त्याने त्याची आयर्लंडची प्रेयसी सोफी शाइनसोबत लग्न केले. मूळची आयर्लंडची रहिवासी असलेली सोफी आणि धवन बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. आता शनिवारी (२१ फेब्रुवारी) धवन आणि सोफी शाइनच्या लग्नाची बातमी समोर आली. धवनचे पहिले लग्न २०१२ मध्ये झाले होते. त्याने बॉक्सर आयेशा मुखर्जीशी लग्न केले. त्यांचे लग्न फक्त नऊ वर्षे टिकले.