'माझे चार ते पाच जणींसोबत विवाहबाह्य संबंध...' (Video)

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जुलै 2019

माझे चार ते पाच महिलांशी विवाहबाह्य संबंध होते. काही प्रकरणं एक वर्षभर चालायची, तर काही दीड वर्ष टिकायची.

कराचीः माझे चार ते पाच महिलांशी विवाहबाह्य संबंध होते. काही प्रकरणं एक वर्षभर चालायची, तर काही दीड वर्ष टिकायची. पण, ही सर्व प्रेम प्रकरणं विवाहापूर्वी होती, असा खुलासा पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाक (वय 39) याने केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे.

एका पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये बोलताना अब्दुल रझाकने विवाहबाह्य संबंधाचा खुलासा केला आहे. अब्दुल रझाक म्हणाला, 'माझे चार ते पाच महिलांशी विवाहबाह्य संबंध होते. पण, काही प्रकरणं एक वर्षभर चालायची, तर काही दीड वर्ष टिकायची. या सर्व संबंधांना एक्स्पायरी डेटही होती. यावेळी शोच्या अँकरने ही सर्व प्रेम प्रकरणं विवाहापूर्वी होती की नंतर? असा प्रश्न विचाल्यानंतर त्याने विवाहानंतर असे उत्तर दिले.' संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अब्दुल रझाक चर्चेत आला आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याची स्तुती करताना आपण त्याला जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करु शकतो, असा विश्वासही रझाकने व्यक्त केला होता. हार्दिक पांड्याच्या फलंदाजीत अनेक त्रुटी आहेत. पण, जर मी त्याला प्रशिक्षण देऊ शकलो, तर जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक बनवू शकतो. बीसीसीआय त्याला एक चांगला अष्टपैलू खेळाडू तयार करण्यासाठी इच्छुक असेल तर मी नेहमीच उपलब्ध आहे.'

अब्दुल रझाक 265 एकदिवसीय सामने खेळला असून, 5080 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतकं आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय, 269 बळी घेतले असून, 35 धावांवर सहा बळी ही त्याची सर्वोत्तम खेळी होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former pakistan all rounder reveals extra marital affairs