esakal | French Open : सेमीफायनलमध्ये नदाल-जोकोव्हिच यांच्यात फाईट?
sakal

बोलून बातमी शोधा

French Open  2021

French Open : सेमीफायनलमध्ये नदाल-जोकोव्हिच यांच्यात फाईट?

sakal_logo
By
सुशांत जाधव

ग्रीसचा स्टीफानोस त्सित्सिपास आणि जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह या उगवत्या टेनिस स्टार्संनी फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. या दोघांतील एकाला फायनलचे तिकीट मिळेल. स्टीफानोस त्सित्सिपास याने रशियाच्या दुसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेव याला पराभूत करत सेमीफायनल गाठली. राफेल नदाल आणि जोकोव्हिच यांच्यात 2008 मध्ये जशील लढत पाहायला मिळाली होती अगदी तशीच लढत या युवांच्या लढतीत टेनिस चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. 22 वर्षीय त्सित्सिपास आणि 24 वर्षीय झ्वेरेव्ह या दोघांनी रेड क्ले कोर्टवरील मास्टर्स 1000 टायटल जिंकले असून 10 जूनला रंगणाऱ्या सेमीफायनलमध्ये दमदार खेळी करुन फायनल गाठण्यासाठी दोघेही उत्सुक असतील.

हेही वाचा: जिमीनं ब्रॉडला म्हटलं होतं लेस्बियन! ट्विट व्हायरल

दुसऱ्या सेमीफायनलसाठी स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल आणि सर्बियाचा नोवाक जोकोव्हिच हे प्रमुख दावेदार असणार आहेत. बुधवारी होणाऱ्या पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये नदाल आणि अर्जेंटिनाच्या डिएगो श्वार्टझमन यांच्यात सामना होईल. तर दुसऱ्या क्वार्टरफायनलमध्ये सर्बियन नोवाक जोकोविच आणि इटलीच्या मॅटिओ बॅरेट्टिनीविरुद्धच्या रंगत पाहायला मिळेल. या दोन्ही सामन्यानंतर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये कोण खेळणार हे स्पष्ट होईल. या लढतीमध्ये काही उलटफेर होणार की नदाल-जोकोव्हिच सेमीफायनलमध्ये धडक मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा: धोनीसोबतच्या मैत्रीतील 'हे' कनेक्शन रैनाला खटकते

महिला गटात स्लोव्हेनियाची झिदानसेक आणि रशियाची बिगरमानांकित अ‍ॅनास्तासिया पाव्हल्यूचेन्कोव्हा या दोघींनी सेमीफायनल गाठली आहे. फायनलासाठी 10 जूनला त्या एकमेकींना भिडतील. दुसरीकडे 17 वर्षीय कोको गॉफ आणि बार्बोरा क्रेझिकोव्हा यांच्यात क्वार्टरफायनलचा सामना रंगणार आहे. दुसऱ्या एका क्वार्टर फायनलमध्ये ग्रीसची मारिया सक्कारी आणि गतविजेती इगा श्वीऑनटेक यांच्यात सेमीफायनलासाठी लढत रंगेल.