esakal | धोनीसोबतच्या मैत्रीतील 'हे' कनेक्शन रैनाला खटकते
sakal

बोलून बातमी शोधा

Raina and Dhoni

धोनीसोबतच्या मैत्रीतील 'हे' कनेक्शन रैनाला खटकते

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांच्यातील मैत्रीचे किस्से नवे नाहीत. धोनीने निवृती घेतल्यानंतर त्याच दिवशी क्रिकेटला अलविदा करुन रैनाने धोनीसोबतची दोस्ती तुटायची नाही सीन दाखवून दिला. याची चांगलीच चर्चाही रंगली. त्यानंतर आता रैनाने आत्मचरित्राच्या माध्यमातून धोनीसोबतच्या मैत्रीतील खंत व्यक्त वाटणाऱ्या गोष्टीचा खुलासा केलाय. सुरेश रैनाने मध्यफळीत आपल्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याची कामगिरी त्याच्यातील क्षमता दाखवून देणारी आहे.

वनडे आणि टी-20 सामन्यात तो भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक होता. पण अनेकदा त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. धोनीसोबतच्या मैत्रीमुळे त्याचे संघातील स्थान टिकून आहे, असेही बोलले गेले. ही गोष्ट मनाला खटकणारी होती, असा उल्लेख रैनाने आपल्या आत्मचरित्रात केलाय.

हेही वाचा: निलंबित इंग्लिश क्रिकेटरसाठी पंतप्रधानांचा '​स्ट्रेट ड्राइव्ह'

रैनाने आपल्या बिलीव्ह : व्हॉट लाइफ अ‍ॅण्ड क्रिकेट टॉट मी Believe: What Life and Cricket Taught Me या आत्मचरित्रात धोनीवर कौतुकाचा वर्षाव केलाय. माझ्याकडून बेस्ट परफॉमन्स काढून कसा घ्यायचा हे माही भाईला चांगले ठाऊक होते. मी त्याच्यावर विश्वास ठेवला, असा उल्लेख रैनाने पुस्तकात केलाय. ज्यावेळी लोक माझे संघातील स्थान हे धोनीसोबतच्या मैत्रीशी जोडतात, त्यावेळी खूप वाईट वाटते. ज्याप्रमाणे मी धोनीवर विश्वास सन्मान केला त्याप्रमाणेच मी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी मेहनत घेतली, असा उल्लेखही रैनाने केला आहे.

धोनी आणि रैना दोघांची मैत्री खूपच जुनी आहे. या जोडीने पाठोपाठ टीम इंडियात एन्ट्री केली होती. धोनीने 2004 तर रैनाने 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. दोघांनी टीम इंडियाला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला. धोनीने 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा करत त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. धोनीच्या निवृत्तीनंतर काही क्षणातच रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 'बायबाय' केले.

हेही वाचा: BCCI विराटची मर्जी राखणार; WTC नंतर टीम इंडियाला सुट्टी

रैनाने टीम इंडियाकडून 226 वनडे सामन्यात 35.31 च्या सरासरीने 5 हजार 615 धावा केल्या आहेत. यात 5 शतक आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. टी20 मध्ये रैनाने 66 डावात 29.18 च्या सरासरीने 1 हजार 605 धावा केल्या आहेत. रैनाच्या नावे टी-20 मध्ये देखील एका शतकाची नोंद आहे. 18 कसोटी सामन्यात रैनाने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले असून यात एका शतकाच्या मदतीने त्याने 768 धावा केल्या आहेत.