esakal | French Open : मारियानं गत सम्राज्ञी इगाला दाखवला इंगा!
sakal

बोलून बातमी शोधा

Maria Sakkari

French Open : मारियानं गत सम्राज्ञी इगाला दाखवला इंगा!

sakal_logo
By
सुशांत जाधव

French Open 2021 : फ्रेंच ओपनची सम्राज्ञी इगा श्वीऑनटेक हिला पराभवाचा धक्का देत ग्रीसच्या मारिया सक्कारीने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. गतवर्षी फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या पोलंडच्या इगाला क्वार्टर फायनलमध्ये 6-4, 6-4 अशा पराभवाचा सामना करावा लागला. 17 व्या मानांकित मारिया सक्कारीने (Maria Sakkari) ने संघर्षमय लढतीत बेल्जियमच्या एलिसे मर्टेंस (Elise Mertens) ला 7-5, 6-7(2), 6-2 असे पराभूत करत पहिल्यांदाच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. मारियाने मागील वर्षी फ्रेंच ओपनची उप विजेती राहिलेल्या अमेरिकेच्या सोफिया केनिन (Sofia Kenin) ला पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये पोहचली होती. (French Open Quarterfinals Defending champion Iga Swiatek crashes out Maria Sakkari storms into semifinals)

दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेझिकोव्हा हिने 17 वर्षीय अमेरिकन कोको गॉफ हिला पराभूत करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. 25 वर्षीय बार्बोराने कोका गॉफ यांच्यातील सामना दोन तास 50 मिनिटे रंगला होता. यात क्रेझिकोव्हाने 7-6 (8-6) 6-3 असा विजय नोंदवला. आता 10 जूनला मारिया सक्कारी आणि क्रेझिकोव्हा यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना रंगणार आहे. तत्पूर्वी महिला गटात स्लोव्हेनियाची झिदानसेक आणि रशियाची बिगरमानांकित अ‍ॅनास्तासिया पाव्हल्यूचेन्कोव्हा या दोघींच्यात फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी रंगत होईल.