esakal | व्हिनस विल्यम्स सलामीलाच गारद
sakal

बोलून बातमी शोधा

पॅरिस - फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत रविवारी व्हिनस विल्यम्सला हरविल्यानंतर चीनच्या वॅंग क्वियांगने व्यक्त केलेली जिगरबाज प्रतिक्रिया.

व्हिनस विल्यम्स सलामीलाच गारद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पॅरिस - अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्सला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले.

जागतिक क्रमवारीत ९१व्या स्थानावर असलेल्या चीनच्या २६ वर्षांच्या वॅंग क्वियांगने व्हिनसला ६-४, ७-५ असे हरविले. ३७ वर्षीय व्हिनसला नववे मानांकन होते. व्हिनसने धाकटी बहीण सेरेनाच्या साथीत दुहेरीतही भाग 
घेतला आहे.

चौथ्या मानांकित एलिना स्विटोलिना हिने आगेकूच केली. ॲला टॉम्लायानोविच हिचा तिने ७-५, ६-३ असा पराभव केला.

पुरुष एकेरीत ग्रिगॉर दिमीत्रोवने इजिप्तच्या महंमद साफ्वात याला ६-१, ६-४, ७-६ (७-१) असे हरविले. सर्बियाच्या व्हिक्‍टर ट्रॉयकी याच्या माघारीमुळे साफ्वातला ऐनवेळी लकी लुझर म्हणून प्रवेश मिळाला. ट्रॉयकीने माघार घेतल्यानंतर लॉकर रुममध्ये ग्रिगॉरला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे ग्रिगॉर चकित झाला होता. साफ्वात ग्रॅंड स्लॅम पदार्पणात पहिल्या ४० मिनिटांत १-६, १-४ असा मागे पडला. त्यानंतर त्याने उजव्या हातावर उपचार करून घेतले. १८२व्या स्थानावरील साफ्वातने त्यानंतर चांगली झुंज दिली.

झ्वेरेव विजयी
द्वितीय मानांकित जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने रिचर्ड बेर्नाकीस याचा ६-१, ६-१, ६-२ असा धुव्वा उडवित विजयी सलामी दिली.

गतविजेती गारद
गतविजेत्या लॅट्वियाच्या जेलेना ऑस्टापेन्कोचे आव्हान सलामीलाच आटोपले. तिला युक्रेनच्या कॅटरीना कॉझ्लोवाने ७-५, ६-३ असे हरविले. जेलेनाला पाचवे मानांकन होते.