
Friendship Day: मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी; मैदानाबाहेर 'मित्रप्रेम'
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंन्डशिप डे साजरा केला जातो. तर उद्या म्हणजेच ७ ऑगस्ट रोजी यावर्षीचा फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. भारतीय क्रिकेटमधील खेळांडूमधील मैत्रीसंबंध कसे होते याबद्दल आम्ही सांगणार आहोत.
आशिष नेहरा आणि विरेंद्र सेहवाग
अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र मोटारसायकलवर बसले आणि त्यांनी शोले चित्रपटातील मैत्रीचे गीत गायले. वीरेंद्र सेहवाग आणि आशिष नेहरानेसुद्धा खऱ्या आयुष्यात तेच केले. ते दोघे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत असताना, सेहवाग आणि नेहरा सेहवागच्या दुचाकीवरून फिरोजशाह कोटला स्टेडियमवर जात होते. प्रवासादरम्यान, नेहरा सेहवागच्या किट बॅगवर डोकं ठेऊन झोप घेत असे. वीरू नजफगडमध्ये राहत होता, तर नेहरा दिल्ली कॅन्टमध्ये राहत होतो. ग्राऊंडला जाताना मी झोपत होतो आणि तो गाडी चालवत होता, तर येताना मी गाडी चालवत होतो आणि तो झोपायचा असं नेहराने एका शोमध्ये बोलताना सांगितलं.
हेही वाचा: अतिवृष्टीने १५ लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली! मदतीसाठी लवकरच पंचनामे
स्मृती मानधना आणि जेमिमाह रॉड्रिग्स, शिखर धवन आणि पृथ्वी शॉ
खेळाडूंच्या बाबतीत विचार करायचा झाला तर, त्यांच्या सार्वजनिक जीवनातील गुंतागुंती स्पष्ट आहेत. त्यांच्या सभोवतालचे प्रत्येकजण स्मार्टफोनवर व्यस्त असल्याने, ते त्यांच्या घरातील मित्रांशी संपर्क करणे पसंत करतात. क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि जेमिमाह रॉड्रिग्स या दोघीसुद्धा स्वतःचे विनोदी व्हिडिओ शेअर करत असतात, कधीकधी चित्रपटातील गाणीदेखील म्हणताना दिसतात. त्याचप्रमाणे शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हेदेखील आपले विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या सोशल मीडियातील व्हिडिओमुळे अनेक लोक त्यांचे चाहते बनले आहेत.
इम्रान खान आणि सुनील गावस्कर
भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी मैदानात उतरतात तेव्हा सर्वजण कट्टरतेने खेळतात पण या खेळाडूंचे मैदानाबाहेरील संबंध चांगले आहेत. जेव्हा भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडू एकमेकांना भेटतात तेव्हा बाहेर जेवायला जाणे आणि एकमेकांना घरी बोलावले जाते. 1986-87 मध्ये पाकिस्तान भारत दौऱ्यावर आला असताना बंगळुरू कसोटीदरम्यान दोन्ही संघांनी हॉटेल पूलमध्ये होळी खेळली होती. दोन्ही बाजूचे दोन दिग्गज असलेले इम्रान खान आणि सुनील गावस्कर यांच्यात परस्पर आदर होता.
1986-87 च्या दौऱ्याच्या सुमारे एक वर्ष आधी, लंडनमध्ये लंचच्या वेळी, इम्राननेच गावस्कर यांना अजून काही काळ खेळण्याचा सल्ला दिला होता. पण नवज्योतसिंग सिद्धूने शोधल्याप्रमाणे भारत-पाकिस्तानने मैत्रीमध्ये एका चांगल्या मार्गावर चालणे आवश्यक आहे. पण इम्रान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहिल्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती.
Web Title: Friendship Day Special Friendships Of Legendary Cricketer
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..