
काही माणसं आपला शौक पूर्ण करण्यासाठी वाट्टेल तितके पैसे खर्च करायला तयार असतात. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन सामने व क्रीडा स्पर्धांचा आनंद घेतात. उपराजधानीत ओमप्रकाश मुंदडा नावाचे असेच एक चाहते आहेत. मुंदडा यांनी गेल्या ४२ वर्षांमध्ये जगभरात झालेल्या जवळपास सर्वच प्रमुख क्रीडा स्पर्धांचा स्टेडियममध्ये बसून आनंद घेतलेला आहे.