
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या त्याच्या शरीरयष्टीमुळे ट्रोल होत आहे. पाकिस्तान येथे सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी मालिकेत त्याचा फॉर्म अपेक्षेप्रमाणे राहिला नाही, त्यावर कॉंग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहमद यांनी सोशल मिडियावर रोहित शर्माला स्थूल म्हणत टीका केली आणि तो कर्णधार म्हणून अपयशी असल्याचाही टोमणा मारला.
गेल्या काही वर्षात अनेकांनी रोहितचा फॉर्म खराब होण्यास त्याचे वजन कारणीभूत असल्याचे म्हटले. मात्रक्रिकेट मध्ये अशा प्रकारचे ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंग हे नवीन नाही. याआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इन्झमाम उल हक यालाही त्याच्या शरीरयष्टीसाठी ट्रोल करण्यात आले होते. मात्र, त्याने वजन घटवल्यानंतर त्याला वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागले