सेंट लुईस (अमेरिका) : ३० वर्षांनंतरही इतिहासाची पुनरावृत्ती कायम राहिली. गॅरी कास्पारोव्हने क्लच चेस लेजेंड्स स्पर्धेतील दहाव्या खेळात विश्वनाथन आनंदचा पराभव करत दोन डाव बाकी असतानाच सामना जिंकला..बरोबर ३० वर्षांपूर्वी, १० ऑक्टोबर १९९५ रोजी, आनंदने न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या १०७व्या मजल्यावर झालेल्या २०-खेळांच्या क्लासिकल वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये १८व्या खेळात बरोबरी पत्करली होती आणि त्यामुळे कास्पारोव्हने १०.५-७.५ अशा फरकाने अजिंक्यपद मिळवले होते..नियमांनुसार, ब्लिट्झ टाइम कंट्रोलअंतर्गत शेवटचे दोन खेळ खेळले गेले आणि आनंदने दोन्ही जिंकले. अखेरीस गुणफलक १३-११ असा राहिला. कास्पारोव्हने ७८,००० अमेरिकी डॉलर्स जिंकले, तर आनंदला ६६,००० डॉलर्स मिळाले. एकूण बक्षीस रकम १,४४,००० डॉलर्स होती..Clutch Chess 2025 : विश्वनाथन आनंद विरुद्ध कास्पारोव; ३० वर्षांनंतर दोन दिग्गज पुन्हा आमनेसामने, विजेत्याला मिळणार 'इतक्या' लाखाचं बक्षीस.सामन्यात कास्पारोव्ह पाच गुणांनी आघाडीवर होता तरी अंतिम दिवशी १२ गुण मिळणार असल्याने आनंदलाही विजेतेपदाची संधी आहे, याची जाणीव कास्पारोव्हला होती..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.