पाकिस्तानी गोलंदाजांना रडवलं! 23 चौकार, 5 षटकार... 20 षटकांत सामना गंभीर अन् उथप्पाने 75 चेंडूत संपवला : Gautam Gambhir and Robin Uthappa | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Gambhir and Robin Uthappa

पाकिस्तानी गोलंदाजांना रडवलं! 23 चौकार, 5 षटकार... 20 षटकांत सामना गंभीर अन् उथप्पाने 75 चेंडूत संपवला

Legends League Cricket : लिजेंड लीग क्रिकेट 2023च्या सामन्यात भारतीय महाराजांच्या संघाने आशियाई लायन्स विरुद्धच्या सामन्यात 10 गडी राखून मोठा विजय नोंदवला. भारताच्या या विजयाचे हिरो होते रॉबिन उथप्पा आणि गौतम गंभीर. दोघांनी 159 धावांची भागीदारी करून आशिया लायन्सला पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही.

महाराजांची कमान गौतम गंभीरच्या खांद्यावर होती. 225 च्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या उथप्पाने सामन्यात 39 चेंडूत 88 धावा ठोकल्या. त्याचवेळी गंभीरच्या बॅटमधून 36 चेंडूत 61 धावा आल्या. 20 षटकांत सामना गंभीर अन् उथप्पाने 75 चेंडूत संपवला आणि भारतीय संघाने हा सामना जिंकला.

आशिया लायन्सने गंभीर आणि उथप्पाला बाद करण्यासाठी 7 गोलंदाजांचा प्रयत्न केला, ज्यामध्ये 5 पाकिस्तानचे अव्वल दर्जाचे गोलंदाज होते. पण या सर्व गोलंदाजांसमोर भारतीयांनी बाजी मारली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आशिया लायन्स संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 157 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारत महाराजाने 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आपल्या डावातील 20 षटकांचीही वाट पाहिली नाही. गंभीर आणि उथप्पा यांनी मिळून केवळ 75 चेंडूंमध्ये म्हणजेच 12.3 षटकांत हे काम केले.

भारत महाराजाने 12.3 षटकांत 158 धावांचे लक्ष्य पार केले तेव्हा यात गंभीर आणि उथप्पाची भूमिका महत्त्वाची होती. या दोघांनी मिळून जवळपास सर्व आशिया लायन्स गोलंदाजांचा पराभव केला, ज्यात 5 पाकिस्तानी आणि 2 श्रीलंकेचा समावेश आहे.

गंभीर आणि उथप्पा यांनी पाकिस्तानी गोलंदाजांना रडवलं. याचा अंदाज या आकडेवारीवरून लावता येईल. सोहेल तन्वीरने 11 च्या इकॉनॉमीसह धावा दिल्या. मोहम्मद अमीरची इकॉनॉमीस 9.66 होती. मोहम्मद हाफीजने 16.50 च्या इकॉनॉमी तर अब्दुर रज्जाक आणि शोएब अख्तर यांनी 12-12 च्या इकॉनॉमीसह धावा दिल्या.

या सामन्यात नाबाद अर्धशतके झळकावणाऱ्या गंभीर आणि उथप्पा विजयाचे नायक ठरले. उथप्पाने 39 चेंडूत 225 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 88 धावा केल्या, ज्यात 11 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याच वेळी, गंभीरने 36 चेंडूत 12 चौकारांसह सुमारे 170 च्या स्ट्राइक रेटने 61 धावा फटकावल्या. अशाप्रकारे या दोन फलंदाजांनी मिळून सामन्यात 23 चौकार आणि 5 षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर नेले.