
Viral Video : नाटू नाटू वर सगळ्यात भारी कोण नाचलं? सुनील गावस्कर, मॅथ्यु हेडन की रवी शास्त्री?
Natu Natu Oscar 2023 RRR Movie Song Sunil : राजामौलींच्या नाटू नाटूवर प्रेम करणारे असंख्य चाहते आहे. जेव्हा या गाण्याला ऑस्कर मिळाला नव्हता तेव्हा देखील त्या गाण्यावर तयार होणाऱ्या रिल्सची संख्या सर्वाधिक होती. हिंदीतील नाचो नाचो गाण्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. भारतीय क्रिकेटविश्वातील दिग्गज खेळाडूंना देखील नाटो नाटोची भुरळ पडल्याचे दिसून आले आहे.
क्रिकेट पासून राजकीय क्षेत्रातील अनेकांना नाटू नाटूनं वेड लावलं आहे. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर नेटकरी, चाहते यांनी संपूर्ण आरआरआरच्या टीमवर कौतूकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले. बॉलीवूडच्या मोठमोठ्या सेलिब्रेटींपासून हॉलीवूडमधील जेम्स कॅमेरुन सारख्या दिग्दर्शकांना देखील या चित्रपटाचे कौतूक असल्याचे दिसून आले आहे.
Also Read - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये क्रिकेटमधील तीन दिग्गज राजामौलींच्या नाटू नाटू गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या तीनही क्रिकेटपटूंचा तो डान्स पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. चाहत्यांनी तर तिघांमध्ये सर्वाधिक भारी डान्सर कोणता हे सांगण्याचे आवाहन नेटकऱ्यांना केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजामौलींच्या आरआरआरनं चाहत्यांना भुरळ पाडली आहे. आता लिटल मास्टर सुनील गावस्कर, ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यु हेडन आणि भारताचा माजी फिरकीपटू आणि प्रसिद्ध समालोचक रवि शास्त्री यांनी ठेका धरला आहे. त्यांचा डान्स हा नेटकऱ्यांना खूप भावला आहे. तो व्हायरल झालेला व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट असल्याचे दिसून आले आहे. क्रिकेटच्या मैदानावर देखील नाटू नाटूचा प्रभाव दिसून येतो आहे.
७३ वर्षांच्या सुनील गावस्कर यांचा तो डान्स नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे. गावस्कर यांचा तो व्हिडिओ स्टार स्पोर्टसनं ट्विटरवर शेयर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये गावस्कर यांच्याशिवाय कॉमेंट्री करत असलेला मॅथ्यु हेडन देखील डान्स करताना दिसतो आहे. तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.