अटी शर्तींपेक्षा पाकशी सर्वच संबंध तोडा : गंभीर

वृत्तसंस्था
सोमवार, 18 मार्च 2019

अटी शर्तीवर पाकिस्तानशी खेळण्याचे संबंध ठेऊ नका, केवळ बहुराष्ट्रीय स्पर्धांत खेळायचे आणि द्विपक्षीय मालिकांवर बंदी घालायची अशी धोरणे ठेऊ नका, पाकिस्तानबरोबर सर्वच प्रकारचे क्रिकेट संबंध संपवून टाका असे खरमरीत मत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि नुकताच पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. 

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : अटी शर्तीवर पाकिस्तानशी खेळण्याचे संबंध ठेऊ नका, केवळ बहुराष्ट्रीय स्पर्धांत खेळायचे आणि द्विपक्षीय मालिकांवर बंदी घालायची अशी धोरणे ठेऊ नका, पाकिस्तानबरोबर सर्वच प्रकारचे क्रिकेट संबंध संपवून टाका असे खरमरीत मत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि नुकताच पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. 

पाकिस्तानविरुद्ध नेहमीच तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या गंभीरने पुलवामा हल्यानंतर अधिकच संताप व्यक्त केलेला आहे. अटी-शर्थींची बंदी असून शकत नाही. एकतर तर तुम्ही पूर्णतः खेळू नका नाही तर सर्व सामन्यांत खेळा. पुलावामा हल्ला संताप आणणारा आहे, अशी जहरी टीका गंभीरने एका व्यावसाईक कार्यक्रमानंतर बोलताना सांगितले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-

World Cup 2019 : फायनल पाकिस्तानशी असेल तरी खेळू नका : गंभीर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gautam gambhir expresses his views on playing with pakistan