
गौतम गंभीरच्या एबी डिव्हिलियर्सबाबत वक्तव्यानंतर क्रिकेट विश्वात गदारोळ!
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर सध्या चर्चेत आला आहे. इंडियन प्रीमियर लीग सुरू होणार आहे. त्याआधी गौतम गंभीरने एबी डिव्हिलियर्सबाबत वक्तव्य केले आहे. गौतम गंभीरने एका चर्चेदरम्यान सांगितले की, एबी डिव्हिलियर्सचे फक्त वैयक्तिक रेकॉर्ड आहेत, तो आयपीएलमध्ये इतका महान नाही. या विधानावरुन गदारोळ झाला आहे. रविवारी गौतम गंभीर ट्विटरवर ट्रेंड झाला. चाहत्यांनी त्याच्या विधानावर टीका केली. गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य केले होते.
गौतम गंभीर म्हणाला होता, 'एबी डिव्हिलियर्स जर चिन्नास्वामीच्या मैदानावर 8-10 वर्षे खेळत आहे आणि ते इतके छोटे मैदान आहे. तिथं कोणाला खेळायला सांगितलं तर त्याचा स्ट्राईक रेट आणि क्षमता सारखीच असेल. सुरेश रैनाच्या नावावर चार आयपीएल जेतेपदे आहेत, पण एबी डिव्हिलियर्सच्या नावावर फक्त वैयक्तिक रेकॉर्ड आहेत.
या विधानावर चाहत्यांनी गौतम गंभीरला ट्विटरवर खूप सुनावले. लोकांनी चिन्नास्वामी मैदानाची आकडेवारीही काढली, एका चाहत्याने लिहिले की, त्या मैदानात गौतम गंभीरचा रेकॉर्ड खराब आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो त्याला सोपं मैदान सांगत होता, पण स्वत: धावा काढू शकला नाही.
एका चाहत्याने लिहिले की, गौतम गंभीरची कोणत्याही मैदानावरील सर्वोच्च सरासरी केवळ 30 आहे, अशा स्थितीत त्याला आधी फलंदाजी माहित नव्हती आणि आता त्याला कसे बोलावे हे कळत नाही. गौतम गंभीरला आयपीएलचा दिग्गज मानला जातो, त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने 2 विजेतेपद जिंकले आहे.
दुसरीकडे, जर आपण एबी डिव्हिलियर्सबद्दल बोललो तर तो आरसीबीसाठी एक दिग्गज आहे. भारतात त्याचे विशेष चाहते आहेत. एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये 184 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 40 च्या सरासरीने 5162 धावा केल्या आहेत. एबी डिव्हिलियर्सच्या नावावरही 3 शतके, 40 अर्धशतके आहेत.