Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिनेश कार्तिकऐवजी रिषभ पंतला खेळवा - गौतम गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gautam gambhir on dinesh karthik and rishabh pant

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिनेश कार्तिकऐवजी रिषभ पंतला खेळवा - गौतम गंभीर

India vs Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी दिनेश कार्तिकऐवजी रिषभ पंतला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पसंती द्यावी,असे मत माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. कार्तिकला फिनिशर म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

पंतसह कार्तिकचीही विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या स्पर्धेत कोणाला पसंती द्यावी, याची चाचणी ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना करता येणार आहे.

हेही वाचा: Indian Team New Jersey : T20 वर्ल्ड कप साठी टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच, पहा Photo

माझ्या मते, पंतला पसंती द्यावी, हे मी अगोदरही सांगत आलेलो आहे. केवळ १०-१२ चेंडू खेळण्यासाठी टी-२० संघात खेळाडू निवडू शकत नाही. त्यामुळे असे खेळाडू प्रत्येक वेळी तुम्हाला सामने जिंकून देऊ शकत नाहीत, कार्तिकने कधीही पहिल्या पाच क्रमांकावर फलंदाजी करण्याची इच्छा दाखवलेली नाही, असे गंभीरचे म्हणणे आहे.

संघात असलेल्या यष्टिरक्षकाने पहिल्या पाच क्रमांकावर फलंदाजी करण्याचे धैर्य दाखवायला हवे. कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची पंतची क्षमता आहे. पंत जर अंतिम संघात असेल तर सहावा गोलंदाज खेळवण्याचाही पर्याय मिळतो, असे सांगून गंभीर पुढे म्हणतो, पंतला केवळ डावखुरा फलंदाज म्हणून पसंती देणे योग्य नाही.

हेही वाचा: T20 World Cup : टीम इंडिया 'या' दिवशी होणार रवाना, BCCI करणार 4 खेळाडूंचा खर्च

पंत पाचव्या क्रमांकावर खेळला तर हार्दिक पंड्या सहावा आणि अक्षर सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आला, त्यानंतर अश्विन संघात असेल तर तो आठव्या क्रमांकावर खेळू शकेल, असे गंभीरचे म्हणणे आहे.

Web Title: Gautam Gambhir On Dinesh Karthik And Rishabh Pant Playing 11 India Vs Australia Indian Cricket Ind Vs Aus

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..