Gautam Gambhir : आश्चर्य! रोहितला चिमटा काढण्यासाठी गौतम गंभीरने केली धोनीची स्तुती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Gambhir surprisingly lauded MS Dhoni

Gautam Gambhir : रोहितपेक्षा जास्त द्विशतकं अन् विराटपेक्षा जास्त शतकं कराल हो, पण... गंभीरने केली धोनीची स्तुती

Gautam Gambhir surprisingly lauded MS Dhoni : भारताला पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश आले. इंग्लंडने सेमीफायनलमध्ये भारताचा 10 विकेट्सनी पराभव करत टी 20 वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आणले. त्यानंतर भारतीय संघ 2013 पासून एकही आयसीसी स्पर्धा जिंकू शकला नसल्याबद्दल संघावर टीका होत आहे. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर टीका करताना चक्क महेंद्रसिंह धोनीचे कौतुक केले. सहसा गौतम गंभीर हा धोनीला सर्व श्रेय देण्यावरून टीका करत असतो. मात्र आता त्याने कॅप्टन म्हणून धोनीचे कौतुक केल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Ashish Nehra : हरभजनची मागणी, गावसकरांचा पाठिंबा; आशिष नेहरा प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत?

गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सशी बोलतना कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर निशाना साधताना धोनीचा स्तुती केली. गौतम गंभीर म्हणाला की, 'एखादा खेळाडू येईल आणि रोहित शर्मापेक्षा जास्त द्विशतके आणि विराटपेक्षा जास्त शतके ठोकेल. मात्र मला नाही वाटत की कोणताही भारतीय कर्णधार तीन आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची करामत करू शकेल.'

हेही वाचा: IND vs ENG : अॅडलेडवर भारत हरला अन् 500 कोटींचा चुराडा झाला

गौतम गंभीरच्या वक्तव्याचा रोख धोनीकडे होता. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2007 चा टी 20 वर्ल्डकप, 2011 चा वनडे वर्ल्डकप आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. महेंद्रसिंह धोनी हा आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकणारा भारताचा पहिला कर्णधार आहे. याचबरोबर त्याने 2010, 2011, 2018 आणि 2021 अशी चार आयपीएल टायटल देखील पटकावली आहेत.