esakal | जर्मनीचा चेक प्रजासत्ताकावर शानदार विजय
sakal

बोलून बातमी शोधा

Football

जर्मनीचा चेक प्रजासत्ताकावर शानदार विजय

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बर्लिन - विश्‍वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेत विश्‍वविजेत्या जर्मनीने सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला; पण इंग्लंडनेही विजयी गुण मिळवला; परंतु प्रतिस्पर्धी कमजोर असूनही त्यांना पूर्ण हुकूमत गाजवता आली नाही. 

थॉमस मुल्लरने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर जर्मनीने चेक प्रजासत्ताकावर 3-0 अशी मात केली. इंग्लंडला जागतिक क्रमवारीत 176 व्या स्थानी असलेल्या माल्टा देशावर केवळ 2-0 असाच विजय मिळवता आला; तर वॉर्साव येथे झालेल्या सामन्यात पोलंडने डेन्मार्कला 3-2 असे नमवले. 

जर्मनीच्या विजयात दोन गोल करणाऱ्या मुल्लरने नॉर्वेविरुद्धच्या 3-0 अशा विजयातही दोन गोल केले होते; परंतु जर्मन फुटबॉल लीगमध्ये बायर्न म्युनिककडून खेळताना त्याला यंदाच्या मोसमात अजून एकही गोल करता आलेला नाही. चेक प्रजासत्ताकाविरुद्धच्या सामन्यात त्याने सुरवातीलाच गोल करून जर्मनीला पकड मिळवून दिली. त्यानंतर टोनी क्रुसने ही आघाडी "डबल‘ केली. 

या सामन्यात जर्मनीचे पूर्ण वर्चस्व होते. सामन्यात 93 टक्के चेंडूचा ताबा जर्मनीकडे होता; परंतु तीनपेक्षा अधिक गोल त्यांना करता आले नाहीत. 

बेलफास्ट येथील सामन्यात उत्तर आयर्लंडने सॅन मारिनोला 4-0 असे हरवले; तर माकसिम मेदवेवने सुरवीताला केलेल्या गोलाच्या जोरावर अझरबैजानने नॉर्वेला 1-0 असे हरविले.

loading image
go to top