
फुटबॉलपटूनं गर्लफ्रेंडला ओठ तुटेपर्यंत मारलं; फोटो ऑडिओ क्लिप व्हायरल
मॅनचेस्टर युनाइटेड फुटबॉल संघाचा फॉरवर्ड आणि स्टार खेळाडू मेसन ग्रीनवुड (Manchester United Mason Greenwood) यांच्यावर त्याच्या गर्लफ्रेंडनं गंभीर आरोप केले आहेत. हॅरियट रॉबसन हिने मारहाण केल्याचा आरोप केला असून तिने दुखापतग्रस्त अवस्थेतील काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. सोशल मिडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसते.
सोशल मीडियावर जे फोटो आणि व्हिडिओ-ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत त्यातील एका फोटोत हॅरियट रॉबसन (Harriet Robson) ओठातून रक्त वाहताना दिसते. अन्य काही फोटोतून तिच्या शरीरावर अनेक जखमा झाल्याचे दिसून येत आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून एक ऑडिओ क्लिप अपलोड केली होती. यात एक पुरुष तिला आक्षेपार्ह शब्दात सुनावताना ऐकायला मिळाले होते.
हेही वाचा: WI vs ENG: होल्डरचा विक्रमी चौका; 4 चेंडूत 4 विकेट्स (VIDEO)
मेसन ग्रीनवुडची (Mason Greenwood) गर्लफ्रेंड हॅरिएटने (Harriet Robson) सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणात पोलिसांनी फुटबॉलरला अटक केली असून तपास सुरु केला आहे. मॅनचेस्टर युनाइटेड क्लबनेही फुटबॉलरवर कारवाई केली आहे. मेसन ग्रीनवुडला प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
यापूर्वी युनाइटेड क्लबने सावध पवित्रा घेतला होता. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले फोटो आणि फुटबॉलवर होणारे गंभीर आरोप यासंदर्भात आम्हाला माहिती आहे. क्लब कोणत्याही प्रकारे अशा घटनेचे समर्थन करत नाही. जोपर्यंत गोष्टी स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणतीही भूमिका घेणार नाही, असे क्लबने म्हटले होते. पोलिसांनी कारवाई करताच क्लबनेही कठोर भूमिका घेतल्याचे दिसते.
Web Title: Football Manchester United Player Mason Greenwood Accused Of Domestic Abuse Sexual Assault Pictures Audio Clips Goes Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..