Glenn Maxwell:'मॅक्स' वेदनेवर 'वेल' विजय ! विश्वचषकात द्विशतक झळकवत नावावर केला 'हा' विक्रम

ग्लेन मॅक्सवेल याने एकाट्याने खिंड लढवली आणि एक विक्रम आपल्या नावावर केला.
Glenn Maxwell
Glenn Maxwell
Updated on

Glenn Maxwell Double Hundred: नुकताच अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सामना खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३ गडी राखून अफगाणिस्तानचा पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २९१ धावा केल्या होत्या. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघांच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आले होते. मात्र, ग्लेन मॅक्सवेल याने एकाट्याने खिंड लढवली आणि एक विक्रम आपल्या नावावर केला.

ग्लेन मॅक्सवेलने या सामन्यात द्विशतक झळकावलं. फलंदाजी करताना त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्याला नीट पळताही येत नव्हतं, पण तरीही तो खेळत राहीला आणि ऑस्ट्रेलिया संघाला विजयाचा उंबरठा पार करुन दिला. त्याने या सामन्यात फक्त १२८ चेंडूत २०१ धावांची झुंजार खेळी केली. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत द्विशतक झळकावणारा मॅक्सवेल पहिलाच फलंदाज ठरला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये खेळवल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर इब्राहिम झद्रान याच्या शतकाच्या जोरावर २९१ धावसंख्या गाठली.

अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग कऱताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली होती. ऑस्ट्रेलियाने २० षटकांच्या आत ७ गडी गमावले होते. मात्र, ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे अफगाणिस्तानच्या तोंडचं पाणी पळवलं. त्याला पॅट कमिंस यानेही उत्तम साथ दिली. (Latest Marathi News)

Glenn Maxwell
World Cup 2023:मॅक्सवेल एकटा अफगाणिस्तानला नडला; 'ही' चूक अफगणिस्तानला ४ वर्ष लक्षात राहील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com