Glenn Philips : न्यूझीलंडचा 4 डी प्लेअर! ग्लेन फिलिप्स म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही

Glenn Philips ENG vs NZ
Glenn Philips ENG vs NZ ESAKAL
Updated on

Glenn Philips ENG vs NZ : भारतात आजपासून सुरू झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होत आहे. या सामन्यात आपल्या कर्णधाराविना खेळणाऱ्या न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी आपला कर्णधार टॉम लॅथमचा निर्णय सार्थ ठरवत तगड्या इंग्लंडला पाठोपाठ धक्के देण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे पार्ट टाईम गोलंदाज ग्लेन फिलिप्सने दमदार गोलंदाजी करत इंग्लंडच्या तगड्या बॅटिंग ऑर्डरला भगदाड पाडले. त्याने मोईन अली आणि सेट झालेल्या जो रूटचा त्रिफळा उडवला.

Glenn Philips ENG vs NZ
World Cup 2023 : मेटा अन् आयसीसीची भागीदारी; 500 पेक्षा जास्त क्रिएटर हलवणार पडद्यामागून सूत्रं

विशेष म्हणजे ग्लेन फिलिप्स हा न्यूझीलंडचा मॅच विनर म्हणून ओळखला जातो. तो उत्तम फलंदाजी, उत्तम श्रेत्ररक्षण, गरज पडल्यास विकेटकिपिंग आणि उपयुक्त गोलंदाजी देखील करतो. त्यामुळे तो न्यूझीलंडचा थ्री डायमेंशन नाही तर फोर डायमेंशन खेळाडू आहे.

आजच्या इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड सामन्याबद्दल बोलायचं झालं तर न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडची अवस्था 4 बाद 138 धावा अशी केली होती. यानंतर जो रूट आणि जॉस बटलर यांनी इंग्लंडचा डाव सावरला होता. या दोघांनी इंग्लंडला 200 च्या जवळ पोहचवले.

Glenn Philips ENG vs NZ
India vs Pakistan: "नरेंद्र मोदी स्टेडियमला ​​धोका, आमच्या टीमला सुरक्षा द्या"; पाक सरकारची भारताकडे मागणी

मात्र बटलर 43 धावा करून बाद झाला. त्यानंतर रूटने 86 चेंडूत 77 धावा करत इंग्लंडला 229 धावांवर पोहचवले. अखेर ग्लेन फिलिप्सने रूटचा त्रिफळा उडवत इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्याने मोईन अलीचा देखील त्रिफळा उडवला होता.

अखेर इंग्लंडच्या तळातील फलंदाजांनी थोडाफार हातभार लावत इंग्लंडला 50 षटकात 9 बाद 282 धावांपर्यंत पोहचवले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 3 तर ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

(World Cup Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com