
Global T20 Namibia Series : नामिबियात भारत - पाकिस्तान थरार ; वाचा कधी होणार सामने
India Vs Pakistan : भारत - पाकिस्तान सामना म्हटलं की संपूर्ण क्रीडा जगताचे लक्ष या सामन्याकडे असते. आता क्रीडा रसिकांना एक प्रकारे भारत - पाकिस्तान (India Vs Pakistan) सामनाच पाहण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. सप्टेंबर महिन्यात ग्लोबल टी 20 नामिबिया सिरीज (Global T20 Namibia series) होणार आहे. या सिरीजमध्ये आयोजक संघाबरोबरच भारतातील बंगाल (Bengal), पाकिस्तानमधील लाहोर कलंदर्स (Lahore Qalandars) आणि दक्षिण आफ्रिकेतील एक स्थानिक संघ सहभागी होणार आहे.
हेही वाचा: नवे सॉफ्टवेअर येणार! वय चोरी रोखण्यासाठी BCCI ने कंबर कसली
नामिबियामध्ये भारत - पाकिस्तानमधील संघ एकमेकांना भिडणार आहेत. सप्टेंबर महिन्यात ज्यावेळी युएईमध्ये आशिया कप खेळवला जाणार आहेत, त्याचवेळी नामिबिया चार संघांची ग्लोबल टी 20 स्पर्धा खेळवणार आहेत. यात नामिबियाचा संघ, भारतातील बंगालचा संघ, पाकिस्तानमधून लाहोर कलंदर्सचा संघ आणि दक्षिण आफ्रिकेमधील एक संघ असे चार संघ सहभागी होणार आहेत. बंगालने नामिबिया टी 20 सिरीज खेळणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लाहोर कलंदर्सने देखील या मालिकेसाठी होकार कळवला आहे. आता फक्त दक्षिण आफ्रिकेतील कोणता संघ या मालिकेत खेळणार आहे याची घोषणा होणे बाकी आहे.
बंगालने या मालिकेसाठी आपला 16 जणांचा संघ निवडला आहे. अभिमन्यू इश्वरन या संघाचे नेतृत्व करेल तर शाहबाज अहमद, इशान पोरेल, मुकेश कुमार, आकाश दीप, ऋतिक चटर्जी यासारखे बंगालचे वरिष्ठ खेळाडू आणि काही नवे चेहरे या संघात असणार आहेत.
हेही वाचा: भारतीय खेळाडूंचा परदेशी टी-20 लीग खेळण्याचा मार्ग मोकळा?
बंगाल क्रिकेट संघाचे (CAB) संयुक्त सचिव देवव्रत दास यांनी सांगितले की 2022 टी 20 वर्ल्डकपमध्ये भाग घेणाऱ्या संघाविरूद्ध खेळण्याची संधी बंगालच्या खेळाडूंना मिळणार आहे. दास म्हणाले की, 'स्पर्धेचे ब्रॉडकास्टर बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक दालमिया यांच्याकडे आले. त्यांनी आम्हाला स्पर्धेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. आम्ही सैयद मुश्ताक अली ट्रॉफीपूर्वी बंगालच्या संघाला सहा - सात सामने खेळण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे आम्ही हे आमंत्रण स्विकारले. आम्हाला एका वर्ल्डकप खेळणाऱ्या संघाविरूद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. जो संघ आम्ही नामिबियाला पाठवणार आहोत तो संघ नवा संघ असेल. या संघातील खेळाडू कसे खेळतात हे आम्हाला पहायचे आहे.'
Web Title: Global T20 Namibia Series India Bengal Pakistan Lahore Team Will Face Each Other
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..