esakal | 'सुवर्णकन्या' अवनीच्या कोच सुमा शिरूर यांचं जल्लोषात स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

Avani-Suma-Coach

'सुवर्णकन्या' अवनीच्या कोच सुमा शिरूर यांचं जल्लोषात स्वागत

sakal_logo
By
हर्षल भदाणे पाटील

पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीत फुलांची उधळण

पनवेल: पॅरालिम्पिक स्पर्धेत अवनी लेखारा हिने सुवर्ण कामगिरी करत दोन पदके आपल्या खात्यात जमा केली. सर्व भारतीय तिच्या कामगिरीचे कौतुक करत आहेत. पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी अवनी ही पहिली भारतीय महिला ठरली. मात्र, तिच्या यशात तिच्या कोच वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सुमा शिरूर यांचा सिंहाचा वाटा आहे. खेळाच्या सुरूवातीला अवनी अचूक नेम धरता येईल का? याबाबत चिंतेत होती. मात्र सुमा शिरूर यांनी अवनीला, 'आपण आतापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज करण्याची हीच संधी आहे. या संधीचे सोने तू करू शकतेस' असं म्हणत तिच्या मनातली भीती काढली. त्यांचे पनवेलमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.

हेही वाचा: अवनी लेखराची ऐतिहासिक कामगिरी; सुवर्ण पदकानंतर कांस्य पदकाची कमाई

सुमा शिरूर यांचे पनवेल मध्ये जल्लोषात स्वागत

पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील लक्ष्य नेमबाजी क्लबमध्ये विद्यार्थी सुमा शिरूर यांची आतुरतेने वाट पाहत होते. सुमा शिरूर यांनी प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करत टाळ्या वाजवत सुमा यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी हजेरी लावली. यावेळी केक कापत साऱ्यांनी सुमा यांना मिळालेल्या यशाचे सेलिब्रेशन केले.

हेही वाचा: अवनी लेखाराने नेमबाजी स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक; पाहा व्हिडिओ

सुमा शिरूर या ४ महिन्याच्या अधिक कालावधीनंतर पनवेल मध्ये आल्या. सुरूवातीला त्या इंडियन टीमसोबत क्रोयेशियाला तब्बल ७० दिवस होत्या. तेथून ते थेट टोकिया ऑलिम्पिकसाठी टीम कोच म्हणून रवाना झाल्या. 15 दिवस टीमसोबत ते त्यांचे मनोबल वाढवत होत्या. त्यानंतर आठवड्याभरासाठी त्या मुंबईत दाखल झाल्या. मात्र लगेच नॅशनल ड्युटी म्हणून पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी त्या दिल्लीत अवनीला प्रशिक्षण देत होत्या. पुन्हा एकदा २४ ऑगस्ट रोजी त्या स्पर्धेसाठी टीमसह पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून गेल्या होत्या.

आगामी काळात होणाऱ्या ISSF ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनमध्ये ५ खेळाडू जाणार आहेत. तर दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर ५० ते ६० नेमबाज खेळाडू लक्ष्य क्लबच्या माध्यमातून जात असतात. लक्ष्य क्लबचे हृदय हजारिका - ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन गोल्ड मेडल 2018 , शाहू माने - युथ ऑलिम्पिक सिल्वर मेडल 2018 , जिना खीट्टा - राष्ट्रीय नॅशनल चॅम्पियन गोल्ड मेडल 2019 या खेळाडूंनी नुकतेच नेमबाजीत यश मिळवले आहे.

loading image
go to top