esakal | अवनी लेखराची ऐतिहासिक कामगिरी; सुवर्ण पदकानंतर कांस्य पदकाची कमाई
sakal

बोलून बातमी शोधा

Avani Lekhara

अवनी लेखराची ऐतिहासिक कामगिरी; सुवर्ण पदकानंतर कांस्य पदकाची कमाई

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Paralympics 2020 : भारताची महिला नेमबाज अवनी लेखराने पॅरालिंपिक स्पर्धेत देशाच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातलीये. 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण वेध साधणाऱ्या अवनीने 50 मीटर रायफल थ्री पोझीशन SH1 प्रकारात दुसरे पदक जिंकले. तिने या क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात एकाच स्पर्धेत देशासाठी दोन पदक जिंकणारी अवनी पहिली भारतीय खेळाडू आहे. तिच्या या पदकासह भारताच्या खात्यात आता 12 पदके जमा झाली आहेत.

पदार्पणाच्या पॅरालिंपिक स्पर्धेत अवनीने यापूर्वी 249.6 गुणांची कमाई करत सुवर्ण पदक पटकावले होते. तिची ही कामगिरी विश्ववक्रमीही ठरली होती. ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी प्रकारात सुवर्ण कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडूही ठरली. त्यानंतर आता एकाच स्पर्धेत दोन पदके मिळवून देत तिने आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय.

हेही वाचा: शमीच्या टीम इंडियातील एन्ट्रीत 'दादा'चा हात; जाणून घ्या रंजक कहाणी

पॅरालिंपिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत 2 सुवर्ण पदकांची कमाई केली असून 6 रौप्य आणि 4 कांस्य पदकासह एकूण 12 पदके मिळाली आहेत. ही भारताची आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च कामगिरी आहे. विशेष म्हणजे यात अवनीच्या एक सुवर्ण पदकासह कांस्य पदकाचा समावेश आहे.

हेही वाचा: Paralympics : प्रवीणच्या चंदेरी कामगिरीला विक्रमाची झालर

loading image
go to top