esakal | 'गोल्डनमॅन' नीरज चोप्राला अभिनव बिंद्रांनी दिलं खास गिफ्ट; पाहा फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

Neeraj-Chopra-Abhinav-Bindra

दोन ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांची झाली सुवर्णभेट

नीरज चोप्राला अभिनव बिंद्रांनी दिलं खास गिफ्ट; पाहा फोटो

sakal_logo
By
विराज भागवत

Tokyo Olympics स्पर्धेत पुरुष भालाफेक (Men's Javelin) प्रकारात भारताच्या नीरज चोप्राने इतिहास रचला. पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करणाऱ्या नीरजने अंतिम फेरीत अधिक चांगली कामगिरी केली. त्याने यंदाच्या स्पर्धेत भारतीयांसाठी सोनेरी आनंद मिळवून दिला. सर्वात लांब भालाफेक करत त्याने सुवर्णपदक पटकावले. 2008 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्रा याने शूटिंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. त्यानंतर वैयक्तिक खेळांमध्ये नीरजने पटकावलेलं पदक हे भारताचं दुसरं सुवर्णपदक ठरलं. हे दोन 'सुवर्णवीर' नुकतेच एकत्र भेटले. त्यावेळी अभिनव बिंद्रा यांनी नीरजला एक खास गिफ्ट दिलं.

हेही वाचा: नीरज चोप्राचं बॉलीवूड अभिनेत्यांना चॅलेंज: एकाच जाहिरातीत पाच भूमिका

पाहा काय आहे ते खास गिफ्ट

नीरज चोप्राने दमदार कामगिरी केल्यानंतर तो गेल्या महिन्यापासून विविध कार्यक्रम आणि सोहळ्यांना हजेरी लावत होता. त्यामुळे त्याला अभिनव बिंद्रा यांची भेट घेता येत नव्हती. पण अखेर काही दिवसांपूर्वी झिराकपूर येथील बिंद्रा यांच्या फार्महाऊसवर या दोघांची भेट घडली. त्यावेळी बिंद्रा यांनी नीरज चोप्राला एका कुत्र्याचं पिल्लू भेट म्हणून दिलं. विशेष म्हणजे, त्या कुत्र्याच्या पिल्लाचं नाव त्यांनी 'टोकयो' असं ठेवलं होतं. हे पिल्लू नीरजला कायम चांगली कामगिरी करण्यास प्रेरणा देईल असं बिंद्रा यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला.

loading image
go to top