samiksha mohije
sakal
हिंगणा - कान्होलीबारा... नावाचं वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील नागपूर जिल्ह्यातील एक गाव. गावातील मुलांची स्वप्नांची स्वप्न मात्र आभाळाएवढी. त्याच गावातून चमकलेली एक मुलगी आज राष्ट्रीय कबड्डीपटू बनून गावात परतली. तिचा सन्मान झाल्याबद्दल गावाचे काळीज अभिमानाने फुलले. समीक्षा संदीप मोहिजे असे या राष्ट्रीय कबड्डीपटू म्हणून गौरविण्यात आलेल्या मुलीचे नाव. तिने गावाचा लौकिक राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचविला.