"रोहितपेक्षाही 'हा' खेळाडू कर्णधारपदासाठी योग्य"; इंग्लंडच्या स्पिनरचं मत

न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीपासून द्रविड टीम इंडियाचा नवा कोच असणार आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaSakal

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघाला नवा कोच आणि नवा कर्णधार मिळालाय. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने 16 सदस्यीय टीमची घोषणा केली. रोहित शर्माकडे अपेक्षेप्रमाणे कर्णधारपद देण्यात आले. दुसरीकडे उप कर्णधारपदाची धूरा ही लोकेश राहुलच्या खांद्यावर टाकण्यात आलीये. न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीपासून द्रविड टीम इंडियाचा नवा कोच असणार आहे.

भारतीय संघात झालेल्या खांदेपालटवर इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्राम स्वान याने प्रतिक्रिया दिलीये. रोहित शर्मा या पदासाठी योग्य पर्याय असला तरी पंत हा अधिक उत्तम पर्याय ठरु शकला असता, असे मत त्याने मांडले आहे. रोहित शर्माच्या वयाचा विचार करता टीम इंडियाने नव्या कर्धाराची निवड करताना रिषभ पंतला संधी दिली असती तर भविष्याच्या दृष्टीने हा निर्णय उत्तम ठरला असता, असे स्वानचे मत आहे.

Rohit Sharma
Semifinal 1: इंग्लंड अन् न्यूझीलंड.. T20 मध्ये कोण भारी?

'क्रिकेट डॉट कॉम'मधील कार्यक्रमात स्वान म्हणाला की, 'रोहित कर्णधारपदासाठी निश्चितच उत्तम पर्याय आहे, परंतु तो मोठ्या काळासाठी संघाचे नेतृत्व करु शकत नाही. जर पंतकडे नेतृत्व दिले असते तर त्याला पुढील दहा वर्षांचा काळ मिळाला असता. पंतने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून नेतृत्वाची क्षमता दाखवून दिलीये. पंतमध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील मिक्सअप झलक पाहायला मिळते. पंत विराटप्रमाणे आक्रमक आहे. दुसरीकडे तो विकेटमागे हसत खेळत आपली जबाबदारी पार पाडताना दिसते, असे स्वानने म्हटले आहे.

Rohit Sharma
T 20 WC : फायनलसाठी UAE सरकारनं राखली BCCI ची मर्जी

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याची जबाबदारी पंतच्या खांद्यानवर पडली होती. ही जबाबदारी पंतने लिलया पेलली. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने प्ले ऑफपर्यंत मजल मारली. याचा दाखला देत स्वानने कॅप्टन्सीच्या शर्यतीत पंत रोहितपेक्षा उत्तम खेळाडू ठरला असता, असे मत व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com