दिव्या देशमुखने जॉर्जिया येथे पार पडलेली महिलांची वर्ल्ड चेस कप स्पर्धा जिंकून इतिहास रचला.बुधवारी रात्री नागपूर विमानतळावर तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.विजयाचे श्रेय तिने आईवडील, प्रशिक्षक आणि नागपूरकर चाहत्यांना दिलं..बातुमी (जॉर्जिया) येथे नुकत्याच पार पडलेल्या महिलांच्या विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेत इतिहास घडवून बुधवारी मायदेशी परतलेल्या ’वर्ल्ड चॅम्पियन’ दिव्या देशमुखचे उपराजधानीत ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी दिव्याने विजयाबद्दल आनंद व्यक्त करून विजयाचे श्रेय दिले आईवडील, प्रशिक्षक व नागपूरकर चाहत्यांना दिले..काळा ब्लेझर व पॅन्ट घातलेल्या १९ वर्षीय दिव्याचे रात्री साडेनऊ वाजताच्या विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. आई डॉ. नम्रता देशमुखसह दिव्या हातात चकाकती ‘वर्ल्डकप ट्रॉफी’ घेऊन विमानतळ परिसरातून बाहेर पडताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी राज्य बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके, चेस असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष गिरीश व्यास यांनी पुष्पहार घालून तिचे जोरदार स्वागत व अभिनंदन केले..यावेळी दिव्याचे पिता डॉ. जितेंद्र देशमुख, आजी कमल देशमुख, काकू डॉ. स्मिता देशमुख यांच्यासह चेस असोसिएशन नागपूरचे कार्यकारी अध्यक्ष सच्चिदानंद सोमण, आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजित कुंटे यांच्यासह बुद्धिबळ संघटनेचे अनेक पदाधिकारी, आजी-माजी खेळाडू, क्रीडाप्रेमी, शालेय विद्यार्थी व दिव्याच्या परिवारातील अन्य सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते..यावेळी प्रसारमाध्यमांशी भावना व्यक्त करताना दिव्याने हा करिअरमधील सर्वोत्तम व ऐतिहासिक विजय असल्याचे सांगून, स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. ही स्पर्धा भविष्यातील आपल्या करिअर मधील मैलाचा दगड असल्याचे सांगताना तिने विजयाचे श्रेय सदैव पाठीशी असलेल्या आई-वडील, प्रशिक्षक व तमाम नागपूरकर चाहत्यांना दिले. जॉर्जिया ते नागपूर हा तब्बल आठ तासांचा विमान प्रवास करूनही तिच्या चेहऱ्यावर थकवा जाणवला नाही. स्मितहास्य करून तिने सर्वांचे अभिवादन स्वीकारले तसेच हस्तांदोलन केले..घरीही जोरदार स्वागतदेशमुख परिवार राहात असलेल्या शंकरनगर येथील घरीही लाडक्या लेकीचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी नातेवाईक व शेजारी व चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दरम्यान, दिव्या देशमुखचा राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.शनिवारी (ता.२) सकाळी ११.३० वाजता रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात होणाऱ्या या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲड. आशीष जायस्वाल उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली..FAQs१. दिव्या देशमुखने कोणती स्पर्धा जिंकली आहे?(Which tournament did Divya Deshmukh win?)➤ दिव्या देशमुखने महिलांची वर्ल्ड चेस कप स्पर्धा जिंकली आहे.२. दिव्या देशमुखचे वय किती आहे?(What is Divya Deshmukh’s age?)➤ दिव्या देशमुख १९ वर्षांची आहे.३. दिव्या देशमुखचं नागपूरमध्ये कसं स्वागत करण्यात आलं?(How was Divya Deshmukh welcomed in Nagpur?)➤ नागपूर विमानतळावर ढोलताशा, पुष्पहार आणि जल्लोषात दिव्या देशमुखचं स्वागत झालं.४. दिव्या देशमुखने विजयाचं श्रेय कोणाला दिलं?(To whom did Divya give credit for her win?)➤ दिव्या देशमुखने आईवडील, प्रशिक्षक आणि नागपूरच्या चाहत्यांना विजयाचं श्रेय दिलं.५. दिव्या देशमुखचा सत्कार सोहळा कुठे होणार आहे?(Where will the felicitation ceremony be held?)➤ दिव्या देशमुखचा सत्कार सोहळा रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात होणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.