
WPL 2023: गुजरात जायंट्सला मोठा धक्का! कर्णधार बाहेर; आता कोणाकडे सोपवली जबाबदारी
Gujarat Giants : महिला प्रीमियर लीग मध्ये गुजरात जायंट्सला मोठा झटका बसला आहे. संघाची कर्णधार बेथ मूनी दुखापतीमुळे WPL मधून बाहेर पडली आहे. तिच्या जागी आता दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्डचा गुजरात संघात समावेश करण्यात आला आहे.
मुनीला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दुखापत झाली होती त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. त्याच्या अनुपस्थितीत स्नेह राणाने संघाचे कर्णधारपद भूषवले होते.
संघाची कर्णधार बेथ मुनी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडली आहे. त्यानंतर स्नेह राणाकडे गुजरातचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. बेथ मुनीच्या जागी लॉरा वोल्वार्डचा संघात समावेश करण्यात आला आहे. गुजरात जायंट्सने ऍशले गार्डनरला संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त केले.
गुजरातचा संघ महिला प्रीमियर लीग 2023 च्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. गुजरातने आत्तापर्यंत 3 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना दोन पराभव पत्करावे लागले आहेत आणि एक जिंकला आहे. गुजरातला त्यांच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर बुधवारी संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पहिला विजय मिळाला.
महिला प्रीमियर लीगच्या लिलावात गुजरात जायंट्स संघाने 2 कोटींना खरेदी करून मूनीला संघात समाविष्ट केले होते. मुनी ही महिला बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. त्याने बिग बॅश लीगमध्ये एकूण 4108 धावा केल्या आहेत.
WPL लिलावात वोल्वार्डला विकत घेण्याचे धाडस कोणत्याही फ्रँचायझीमध्ये नव्हते. लॉराने लिलावात तिची मूळ किंमत 30 लाख रुपये निश्चित केली होती. वोल्वार्डने आतापर्यंत 53 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 30.82 च्या सरासरीने 1,079 धावा केल्या आहेत.