Video : चाहत्यांसोबत गरबा खेळताना दिसला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Niraj Chopra

Video : चाहत्यांसोबत गरबा खेळताना दिसला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा

Niraj Chora Dandia Video : गुजरातमध्ये होणाऱ्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आणि पीव्ही सिंधूही यावेळी उपस्थित राहणार आहेत. मात्र, ते या स्पर्धेत सहभागी होणार नसून, उद्घाटनापूर्वी गोल्डन बॉय नीरज चोप्राचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये नीरज चाहत्यांसोबत गरबा खेळताना दिसून येत आहे.

वडोदरा येथे आयोजित एका कार्यक्रमात नीरजने जोरदार गरबा खेळला. यावेळी त्यांच्यासोबत समालोचक चारू शर्माही उपस्थित होते. दोघांनी मिळून उपस्थित नागरिकांसोबत जबरदस्त डान्स केला. नीरजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Sharad Pawar : एक दौरा अन् सत्तेत पुन्हा...; सुप्रिया सुळेंच्या विधानानं भुवया उंचावल्या

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना राष्ट्रीय खेळात खेळणे बंधनकारक केले होते, परंतु अनेक पदक विजेत्यांनी दुखापतींचे कारण देत या खेळातून माघार घेतली आहे. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आणि कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग यांच्यानंतर टोकियो कांस्यपदक विजेता रवी कुमार आणि रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकही या स्पर्धेत दिसणार नाहीये.