Modi Stadium : गुजरातच्या मोदी स्टेडियमची गिनीज बुकात नोंद; प्रेक्षक संख्येचा विक्रम

Jay Shah
Jay ShahSakal

अहमदाबाद : गुजरातेतील मोदी स्टेडियमची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. सर्वांत जास्त प्रेक्षक संख्येचा विक्रम या स्टेडियमने केला आहे. २०२२ मध्ये झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यातील प्रेक्षक संख्येवरून हा रेकॉर्ड झाला आहे. BCCIने ही माहिती दिली आहे.

(Gujrat's modi stadium Guinness World Record for the largest attendance)

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

दरम्यान, २०२२ मध्ये झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात जवळपास १ लाख १ हजार ५६६ प्रेक्षकांची विक्रमी नोंद करण्यात आली आहे. हा सामना २९ मे रोजी गुजरातेतील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळवला गेला होता. या विक्रमी प्रेक्षक संख्येवरून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेत बीसीसीआयने अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही माहिती दिली असून ही गुजरात क्रिकेट असोसिएशनची मोठी उपलब्धी असल्याचं जय शाह यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com