Gukesh D Chess Player : अवघ्या 17 वर्षाच्या गुकेशने विश्वनाथान आनंदलाही टाकलं मागं

Gukesh D Chess Player
Gukesh D Chess Playeresakal

Gukesh D Chess Player : किशोर ग्रँडमास्टर डी गुकेशने गुरूवारी बुद्धीबळ वर्ल्डकपच्या दुसऱ्या फेरीत अजरबैजानच्या मिसरातदिन इस्कांद्रोवला पराभवाचा धक्का दिला. याबरोबरच गुकेशने फिडे (Federation Internationale des Echecs) च्या लाईव्ह वर्ल्ड रेटिंगमध्ये आपला आदर्श विश्वनाथन आनंदला देखील मागे टाकले.

आता तो वर्ल्ड रँकिंगच्या 9 व्या स्थानावर पोहचला आहे. विश्वनाथन आनंद 10 व्या स्थानावर आहे. अवघ्या 17 वर्षाच्या गुकेशने दुसऱ्या फेरीत दुसऱ्या डावातच अजरबैजानच्या इस्कांद्रोवला 44 चालीत चेकमेट केलं.

Gukesh D Chess Player
Asia Cup 2023 : आशिया कपपूर्वी भारतीय संघाला मिळाली एक चांगली बातमी मात्र...

फिडेने आपल्या अधिकृत वक्तव्यात सांगितले की, 'डी गुकेशने आज पुन्हा एकदा विजय मिळवला आणि रेटिंगमध्ये विश्वनाथन आनंदच्या पुढे निघून गेला. 1 सप्टेंबरला प्रसिद्ध होणाऱ्या फिडे रेटिंगला अजून एक महिना अवकाश आहे. मात्र 17 वर्षाचा गुकेश हा सर्वाधिक रेटिंग असलेला खेळाडू होण्याची दाट शक्यता आहे. तो वर्ल्ड रँकिंगमध्ये पहिल्या 10 मध्ये जागा निश्चित करेल.'

Gukesh D Chess Player
Video: पदार्पणातच 2 षटकारांसह सुरुवात करणाऱ्या तिलक वर्माला दक्षिण आफ्रिकेतून खास मेसेज

2016 मध्ये हरिकृष्णन गेला होता पुढे मात्र...

विश्वनाथन आनंदला बुद्धीबळ फिडे रँकिंगमध्ये एका भारतीयने मागे टाकण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2016 मध्ये हरिकृष्णनने आनंदला मागे टाकले होते. मात्र त्याला आपले रँकिंग फार काळ वर ठेवता आले नाही. गुकेशला 2.5 रेटिंग पॉईंट्सचा फायदा झाला आहे.

त्याचे लाईव्ह रेटिंग हे 2755.9 इतके आहे. जर आनंदचे रेटिंग हे 2754.0 इतके आहे. गुकेश आनंदला मागे टाकत नवव्या स्थानावर पोहचला असून पाचवेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेला आनंद 10 व्या स्थानावर घसरला आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com