

World Chess Championship 2026 Gukesh Shows Strong Defence Under Time Pressure to Draw First Game Against Sindarov
sakal
-अनुपमा गोखले
स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे चालू असलेल्या बुद्धिबळ विश्वविजेतेपदाच्या लढतीतील विद्यमान जगज्जेता दोमाराजू गुकेश व आव्हानवीर जावोखिर सिंदारॉव्ह यांच्यातील पहिला डाव अटीतटीच्या लढतीनंतर बरोबरीत सुटला. सुरुवातीला सिंदारॉव्हने गुकेशला कोंडीत पकडले होते. पण घड्याळावर खूप कमी वेळ असताना सुद्धा अत्यंत उत्कृष्ट बचावाचे प्रदर्शन करीत गुकेशने डाव ३८ चालींनंतर बरोबरीत राखण्यात यश मिळवले. ह्या लढतीतील पहिलावहिला डाव सुरु होण्यापूर्वी दोन्ही खेळाडूंच्या मनात संमिश्र भावना असतील. २०१८ साली, गुकेश आणि सिंदारॉव्ह दोघे केवळ १२ वर्षांचे असताना मॉस्को येथील खुल्या स्पर्धेत प्रथमच एकमेकांसोबत खेळले होते.