गुरूनैदूने युवा वेटलिफ्टिंग वर्ल्डकपमध्ये घडवला 'सुवर्ण' इतिहास

Gurunaidu Sanapathi India's first weightlifter to win a gold Medal at IWF Youth World Championships
Gurunaidu Sanapathi India's first weightlifter to win a gold Medal at IWF Youth World Championships esakal

लेऑन (मॅक्सिको) : गुरूनैदू सनपतीने मॅक्सिकोमधील लेऑन शहरात झालेल्या युथ वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले. युथ वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय वेटलिफ्टर ठरला. 16 वर्षाच्या गुरूनैदूने एकूण 230 किलो (104 किलो, 126 किलो) वजन उचलून मुलांच्या 55 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. (Gurunaidu Sanapathi India's first weightlifter to win a gold Medal at IWF Youth World Championships)

Gurunaidu Sanapathi India's first weightlifter to win a gold Medal at IWF Youth World Championships
IPL प्रक्षेपण हक्क मिळवण्यात सोनी टीव्हीने मारली बाजी?

सनपतीने 2020 मध्ये आशियाई युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावले होते. गुरूनैदूने सुवर्णपदक जिंकलेल्या मॅक्सिकोमधील युथ वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सौदी अरेबियाच्या अली माजीदने 229 किलो वजन उचलत रौप्य तर कझाकिस्तानच्या उमरोव्हने 224 किलो वजन उतलत कांस्य पदक पटकावले.

Gurunaidu Sanapathi India's first weightlifter to win a gold Medal at IWF Youth World Championships
पाक - विंडीज सामन्यात 'टीम इंडिया'साठी पोस्टरबाजी

सनपतीबरोबरच महाराष्ट्राची महिला वेटलिफ्टर सौम्या एस. दळवीने कांस्य पदकाची कमाई केली. दळवीने खेलो इंडियामध्ये दोन वेळा सुवर्णपदक पटकावले होते. तिने या स्पर्धेत 45 किलो वजनी गटात एकूण 148 किलो वजन (65kg 83kg) उचलले. याच वजनीगटात फिलिपाईन्सची रोज जे रामोसने 155 किलो वजन (70kg 85kg) उचलून सुवर्ण तर माँटिलाने 153 किलो (71kg 82kg) वजन उचलून रौप्य पदक पटकावले.

युथ वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची पदकसंख्या आता 4 झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आकांक्षा किशोर आणि विजय प्रजापती या दोघांनीही रौप्य पदकाची कमाई केली होती. भारत गेल्या वेळी युथ वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाला नव्हता. ही स्पर्धा सौदी अरेबियातील जेडाह येथे पार पडली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com