पाक - विंडीज सामन्यात 'टीम इंडिया'साठी पोस्टरबाजी

We Want To Welcome India Poster Wave During Pakistan West Indies 3rd ODI in Multan Cricket Stadium
We Want To Welcome India Poster Wave During Pakistan West Indies 3rd ODI in Multan Cricket Stadium esakal

नवी दिल्ली : वेस्ट इंडीजचा (West Indies) संघ सध्या पाकिस्तान (Pakistan) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील तिसरा आणि अखेरचा सामना मुल्तानमध्ये खेळला गेला. मात्र या मालिकेदरम्यान देखील पाकिस्तानी प्रेक्षकांमध्ये टीम इंडियाची (Team India) क्रेझ दिसून आली. भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आयसीसी आणि आशिया कपमध्येच आमने सामने येतात. दहशतवादाच्या कारणामुळे भारत - पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका अनेक वर्षापासून बंद आहे.

We Want To Welcome India Poster Wave During Pakistan West Indies 3rd ODI in Multan Cricket Stadium
कोहली-स्मिथचा रेकॉर्ड धोक्यात, जो रुटचे किवींविरुद्ध आणखी एक शतक

जरी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका होत नसल्या तरी पाकिस्तानातील क्रिकेट चाहत्यांना भारताने पाकिस्तानचा दौरा करावा असे वाटते. वेळोवेळी पाकिस्तानच्या प्रेक्षक गॅलरीतून टीम इंडियातील खेळाडूंविषयी प्रेम व्यक्त करणारे फलक (Poster) झळकत असतात. असाच फलक पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान झळकला.

We Want To Welcome India Poster Wave During Pakistan West Indies 3rd ODI in Multan Cricket Stadium
'मी सचिननंतर मलिकची वाट पाहतोय' सुनील गावसकर असं का म्हणाले?

तिसऱ्या सामन्यावेळी पाकिस्तानचा गोलंदाज शहनवाज दहानीने वेस्ट इंडीजच्या फलंदाजाला बाद केले. त्यानंतर कॅमेरामनने कॅमेरा प्रेक्षक गॅलरीकडे वळवला. यावेळी एक चाहत्याने हातात घेतलेल्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधले. या पोस्टरवर आम्ही इथे भारताचे स्वागत करू इच्छितो (We Want To Welcome India) असे लिहिले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनेकवेळा भारतासमोर द्विपक्षीय मालिका खेळण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र भारताने याला कोणताही प्रतिसाद अजूनपर्यंत दिलेला नाही.

दरम्यान, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील वनडे मालिका पाकिस्तानने 3 - ० अशी जिंकली. मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकने 48 षटकात 9 फलंदाजांच्या मोबदल्यात 269 धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने 37.2 षटकात 216 धावा केल्या. पाकिस्तानच्या शादाब खानला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com