प्रशिक्षकाने परवानगी शिवाय काढला व्हिडिओ; महिला जिमनॅस्टचा आरोप

Gymnastic Player Aruna Budda Reddy
Gymnastic Player Aruna Budda Reddy esakal

भारताची जिमनॅस्ट अरूणा बुद्दा रेड्टीने तिचा परवानगी शिवाय तिच्या शारिरीक तंदुरूस्ती चाचणीवेळी चित्रिकरण केल्याचा आरोप मार्च महिन्यात केला होता. आता स्पोट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (SAI) या प्रकरणी तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्षपद एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर राधिका श्रीमन यांच्याकडे देण्यात आले आहे. श्रीमन यांच्याबरोबरच या समितीत प्रशिक्षक कमलेश तिवाना आणि उपसंचालक कैलाश मीना यांचा समावेश आहे. (gymnast Aruna Budda Reddy allegations of being videographed without consent By Coach)

Gymnastic Player Aruna Budda Reddy
रजतने केले खास रेकॉर्ड; वॉर्नरनंतर झळकणार पाटीदारचे नाव

जिमनॅस्टपटू रेड्डीने प्रशिक्षक रोहित जैसवाल यांच्यावर हे आऱोप केले आहेत. रोहित जौसवाल यांना जिमनॅस्ट फेडरेशन ऑफ इंडियाने क्लीनचीट दिली आहे. मात्र रेड्डीने जैसवाल यांच्याविरूद्ध कोर्टात जाण्याची धमकी दिली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी साई मार्फत करण्यात येणार आहे. आता या प्रकरणी चौकशी समिती दोन्हीकडच्या बाजू ऐकून घेऊन याबाबतचा अहवाल पुढच्या आठवड्यात देण्याची शक्यता आहे.

साईच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'हे प्रकरण सकाळी उजेडात आले. आम्ही आरोप करण्यात आलेल्या प्रशिक्षकाकडून याबाबतचा अहवाल मागवला आहे. आम्ही याच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीला पुढच्या आठवड्यापर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.'

Gymnastic Player Aruna Budda Reddy
'कॅप्टन' हार्दिक पांड्याने आश्चर्याचा धक्का दिला : मांजरेकर

अरूण रेड्डीने 2018 मध्ये मेलबर्नमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिला वॉल्ट प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली होती. ती म्हणाली की ज्यावेळी ती दिल्लीत शारिरीक चाचणीसाठी आले होते त्यावेळी हा प्रकार घडला. ती बाकू येथे 31 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान होणाऱ्या वर्ल्डकपच्या पूर्वतयारीसाठी आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com