लंडन/इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेटविश्वातून एक धक्कादायक आणि लज्जास्पद घटना समोर आली आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान अ संघातील २४ वर्षीय फलंदाज हैदर अली (Haider Ali Arrest) याला बलात्काराच्या आरोपाखाली यूके पोलिसांनी (UK Police) अटक केली आहे. ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी अलीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला असून, त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. सध्या तो जामिनावर मुक्त असला, तरी तपास पूर्ण होईपर्यंत इंग्लंडमधून बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.