Asian Games Wushu
Asian Games WushueSakal

Asian Games : भारताच्या रोशिबिना देवीने रचला इतिहास; वुशू क्रीडाप्रकारात मिळवलं रौप्य पदक!

Wushu : अंतिम सामन्यात रोशिबिनाची मॅच चीनच्या वु श्याओवेई हिच्यासोबत होती. 2-0 अशा फरकाने वुने ही मॅच जिंकली.
Published on

चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताने आणखी एक चमकदार कामगिरी केली आहे. महिलांच्या 60 किलो सांदा वुशू या क्रीडाप्रकारात भारताच्या रोशिबिना देवी नाओरेम हिने रौप्य पदक मिळवले आहे.

अंतिम सामन्यात रोशिबिनाची मॅच चीनच्या वु श्याओवेई हिच्यासोबत होती. 2-0 अशा फरकाने वुने ही मॅच जिंकली. रोशिबिनाने 2018 साली जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकले होते. आता रौप्य पदक जिंकून तिने आणखी चांगलं प्रदर्शन केलं आहे.

यापूर्वी क्वार्टर फायनल्समध्ये कझाकिस्तानच्या ऐमन या खेळाडूला हरवत रोशिबिनाने आपलं पदक निश्चित केलं होतं. त्यानंतर सेमी फायनलमध्ये तिने व्हिएतनामच्या न्गुयेन या खेळाडूला 2-0 अशा फरकारने हरवलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com