Happy Birthday Rahul Dravid : 'द वॉल'ची ही खेळी पाहाच; बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जानेवारी 2020

भारतीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने सभ्यगृहस्थांचा खेळ अशी ओळख द्रविडने करुन दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2012 मध्ये निवृत्ती घेतल्यावरही भारत अ आणि 19 वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक म्हणून उत्तम कामगिरी केली आहे.

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'दि वॉल' अशी ओळख असणाऱ्या राहुल द्रविडचा आज 47 वा वाढदिवस असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) द्रविडच्या एका सर्वोत्तम खेळीचा व्हिडिओ शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने सभ्यगृहस्थांचा खेळ अशी ओळख द्रविडने करुन दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2012 मध्ये निवृत्ती घेतल्यावरही भारत अ आणि 19 वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. भारतीय क्रिकेटच्या दि वॉलवर वाढदिवसानिमित्त क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सलामीला यायचय?, विकेट लवकर पडल्यात?, यष्टीरक्षक हवाय? राहुल आहेच... अशा कुठली गोष्ट होती. जी राहुलं केली नाही? संघासाठी कुठलीही भूमिका कुठलीही तक्रार न करता त्यानं निभावली. त्याच्या अनेक खेळी आजही क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहेत. क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या लॉर्डसवर द्रविडने पहिला कसोटी सामना खेळला. त्या सामन्यात 95 धावांची खेळी करून त्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy birthday Rahul Dravid team india the wall birthday special know about his career