Suryakumar Yadav : पदार्पणातच पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणारा 'सूर्या' वर्ल्डकप साठी तयार

T20 आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारा सूर्यकुमार यादव पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे.
suryakumar yadav
suryakumar yadavsakal

Suryakumar Yadav Birthday : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आज 32 वर्षांचा झाला आहे. सध्याच्या काळात देशातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये त्याची गणना केल्या जात आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सूर्यकुमार यादव आता टी-20 विश्वचषकमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सूर्यकुमारचा या जागतिक स्पर्धेसाठी 15 जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

suryakumar yadav
Ind vs Eng : स्मृती मानधनाच्या तुफानी खेळीच्या जोरावर इंग्लंडचा केला पराभव

सूर्यकुमार यादवने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. परंतु त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. इशान किशननेही या सामन्यात पदार्पण केले होते आणि 32 चेंडूत 56 धावा केल्याबद्दल त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने हा सामना 7 विकेटने जिंकला.

suryakumar yadav
क्रिकेटच्या मैदानात कॅप्टन्सी करणं अवघड; दिग्गज खेळाडूच्या विधानानं भुवया उंचावल्या

सूर्यकुमार यादवला याच मालिकेतील चौथ्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर तो डावाच्या चौथ्या षटकात मैदानात आला. जोफ्रा आर्चरच्या षटकातील ५वा चेंडू फाइन लेगच्या दिशेने त्याने षटकार मारला. T20 आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. या सामन्यात त्याने 31 चेंडूत 57 धावा केल्या आणि तो सामनावीर ठरला.

सूर्यकुमारने आतापर्यंत 13 एकदिवसीय आणि 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2 अर्धशतकांच्या मदतीने 340 धावा केल्या आहेत. तर टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये एक शतक आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने 811 धावा केल्या आहेत. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. त्याने मुंबईसाठी द्विशतकही झळकावले आहे. एवढेच नाही तर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 24 विकेट्सही घेतल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com