क्रिकेटच्या मैदानात कॅप्टन्सी करणं अवघड; दिग्गज खेळाडूच्या विधानानं भुवया उंचावल्या

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत नेतृत्व करणे कठीणच, दिग्गज खेळाडूचा दावा
Pat Cummins
Pat Cumminssakal

Pat Cummins : तिन्ही प्रकारांत नेतृत्व करणे हे सध्याच्या क्रिकेटमध्ये अतिशय कठीण आहे. त्यात तुम्ही जर वेगवान गोलंदाज असाल तर जवळपास अशक्यच आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने व्यक्त केले.

अॅरॉन फिन्चने ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपद सोडले आहे. त्यानंतर पुढचा कर्णधार कोण अशी चर्चा सुरू झाली आहे. कमिन्स कसोटीचा कर्णधार असल्यामुळे त्याचेही नाव घेतले जात आहे, पण कमिन्सने सद्य परिस्थितीवर भाष्य केले आहे. स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नही कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत.

Pat Cummins
Mohammed Shami : शमीला का वगळले?; माजी क्रिकेटपटूंच्या मनात प्रश्नांचं काहूर

मुळात कमिन्स आता व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये निवडक सामने खेळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या गेल्या ६६ पैकी २८ एकदिवसीय सामन्यांतच तो खेळला आहे. याचा अर्थ कसोटी मालिकांसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी तो काही एकदिवसीय सामने किंवा मलिकांतून विश्रांती घेतो.

प्रत्येक फॉरमॅटमधील प्रत्येक सामन्यात खेळणे हे आता वास्तव राहिलेले नाही. वेगवान गोलंदाज असाल तर भरगच्च कार्यक्रमातून विश्रांतीसाठी कालावधी निर्माण करायला लागत असतो, असे सांगून कमिन्स म्हणाला, कसोटी कर्णधापदी मी समाधानी आहे. एकदिवसीय प्रकारासाठी आताच कर्णधार जाहीर करण्याची घाई क्रिकेट ऑस्ट्रेलिया करणार नाही.

Pat Cummins
Asia Cup 2022 : चुरशीचा झाला! मात्र 'या' घटनांनी गालबोट लावलेच

चेंडू कुरतडण्याच्या प्रकारानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर घालण्यात आलेली कर्णधारपदाची बंदी उठवावी, अशी मागणी कमिन्सने केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दोन महिन्यांनंतर पुढचा एकदिवसीय सामना खेळणार आहे, त्यामुळे त्यांच्याकडे दोन महिन्यांचा कालावधी आहे, असेही

कमिन्स म्हणाला.

कमिन्स हा महत्त्वाचा सदस्य आहे आणि एकदिवसीय प्रकारात तो नेतृत्व करण्यास तयार असेल तर त्याला निश्चितच प्राधान्य असेल, असे मत वॉर्नरने व्यक्त केले, पण मला जर कर्णधारपदाबाबत विचारण्यात आले तर तो माझा सन्मानच असेल, पण सध्या तरी मी माझ्यावर असलेल्या जबाबदारीकडे लक्ष केंद्रित केले आहे, पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माझ्याबाबत विचार केला तर माझा फोन माझ्या जवळच आहे, असेही वॉर्नर म्हणतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com