esakal | HBD Virat : क्रिकेटर विराटची थक्क करणारी ब्रँड व्हॅल्यू
sakal

बोलून बातमी शोधा

virat kohli

जवळपास 17 हून अधिक ब्रँड्सचे प्रतिनिधीत्व विराट कोहली करतो.

HBD Virat : क्रिकेटर विराटची थक्क करणारी ब्रँड व्हॅल्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

विराट कोहली याचा आज 32 वाढदिवस... अर्थात तुम्हाला सगळ्यांना त्याच्या क्रिकेटच्या मैदानातील जलवा माहितीच आहे. त्याविषयी आपण बोलूच... पण या मैदानातील कामगिरीच्या जोरावर विराट सध्या स्वत:लाच वेगवेगळ्या ब्रँड्सना विकतो आहे. तो किती ब्रँड्सशी जोडला गेलाय आणि किती पैसे कमावतो हे आपल्याला माहीतेय का? एक यशस्वी क्रिकेटपटू ते सर्वांत जास्त विकला जाणारा खेळाडू  हा विराटचा प्रवासदेखील पाहण्याजोगा आहे. म्हणूनच आपण बोलणार आहोत... ते 'ब्रँड' असलेल्या विराट कोहलीबद्दल...

क्रिकेटमधील 'विराट' कामगिरी
दहा वर्षांपूर्वी २४ डिसेंबर २००९ रोजी विराट कोहली याने वनडे क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले होते.  श्रीलंकेच्याविरुद्ध कोलकातामध्ये त्याने १०७ धावांची खेळी केली होती. गेल्या दहा वर्षात विराटने ज्या वेगाने धावा केल्या आहेत तो वेग काही आता थांबण्याचे नाव घेत नाहीये. संघातील एका युवा खेळाडूपासून सुरु झालेला त्याचा हा प्रवास आता एक यशस्वी कर्णधारापर्यंत येऊन पोहोचला आहे. क्रिकेट जगतातील गेल्या दशकांतील सर्वोत्कृष्ट असा क्रिकेटपूट म्हणून विराटचे नाव घेतले जाते. अन्य फलंदाजांच्या तुलनेत विराट 22 शतकांनी पुढे आहे. विराटने गेल्या १० वर्षात अन्य फलंदाजांच्यापेक्षा पाच हजार 775 अधिक धावा केल्या आहेत. या विराट अशा कामगिरीमुळेच जगातील सर्वोत्तम संघाचे नेतृत्व कोहलीकडे दिले गेले.

ब्रँड विराट कोहली
ही झाली विराटची क्रिकेटमधली कामगिरी... पण या कामगिरीच्या जोरावर विराट आज चमकता सितारा बनला हे खरंय... पण विराट सध्या स्वत:लाच वेगवेगळ्या ब्रँड्सना विकतो आहे. तो किती ब्रँड्सशी जोडला गेलाय आणि किती पैसे कमावतो हे आपल्याला माहीतेय का? 

फुटबॉलपटूपेक्षा किंवा नॅशनल बास्केटबॉल असोशिएशनमधल्या खेळाडूंच्या आसपासदेखील क्रिकेटर्सना मानधन मिळत नाही. याचं कारण आहे की क्रिकेट हा क्लबकडून खेळवला जाणारा खेळ नाहीये. मुख्यत: तो आंतरराष्ट्रीय पातळीवर आपापल्या देशांच्या संघाकडूनच खेळवला जातो. फुटबॉल अथवा बास्केटबॉलचं तसं नाहीये. म्हणून या खेळाडूंचे मानधन खुप जास्त पटीने असते. मात्र, खेळ खेळून मिळणाऱ्या पैशांपेक्षा क्रिकेटमधील अनेक खेळाडू स्वत:च्या ब्रँड व्ह्याल्यूमधूनच जास्त पैसे कमावतात. आणि विराट हा त्यातीलच एक मोठा खेळाडू. 

1600 कोटी रुपयांची ब्रँड व्हॅल्यू
जवळपास 17 हून अधिक ब्रँड्सचे प्रतिनिधीत्व विराट कोहली करतो. 1600 कोटी रुपयांहून अधिक त्याची ब्रँड व्हॅल्यू आहे. Great Learning, iQOO, Blue Star, Wellman, Himalaya, Myntra, Google Duo, Mobile Premier League, Shyam Steel, Puma, Hero MotoCorp, Colgate या आणि अशा अनेक कंपन्या यात सामिल आहे. या साऱ्या कंपन्यांचा तो ब्रँड एम्बासिडर आहे. 

सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू
या वर्षाच्या सुरूवातीस, फोर्ब्स मॅगझीनने २०२० च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या १०० खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये विराट कोहली हा एकमेव क्रिकेटपटू होता. एकमेव भारतीय होता आणि तो 66 व्या स्थानावर होता. अंदाजे 28 मिलीयन डॉलर्स इतके उत्पन्न मिळवून तो जगातील सर्वाधिक मानधन घेणारा क्रिकेटपटू देखील आहे. त्याची ही कमाई सुप्रसिद्ध फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी यांच्यापेक्षाही जास्त आहे. मे 2019 मध्ये विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना मायंत्रा या कंपनीने त्यांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. अंदाजानुसार या ई-कॉमर्स कंपनीने या जोडप्यासाठी ब्रँड एंडोर्समेंट फी म्हणून 10 कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत. बॉलिवूड आणि क्रिकेटचा जवळचा संबंध दर्शविणे ही या जोडप्यास एकत्र आणण्यामागची कल्पना होती.