BCCI अधिकाऱ्यांनी करियर संपवलं; भज्जीनं घेतलं धोनीचंही नाव | Harbhajan Blames Dhoni | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harbhajan Blames Dhoni
BCCI अधिकाऱ्यांनी करियर संपवलं; भज्जीनं घेतलं धोनीचही नाव

BCCI अधिकाऱ्यांनी करियर संपवलं; भज्जीनं घेतलं धोनीचंही नाव

धोनीवर ब्लेम करुन प्रेमही दाखवून देण्याचा प्रयत्न

भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. माझे करियर उद्धवस्त करण्यामागे काही अधिकाऱ्यांचा हात होता, असे त्याने म्हटले. ज्या बीसीसीआय (BCCI) अधिकाऱ्यांनी मला बाहेर काढले त्यांना महेंद्रसिंह धोनीनंही (Harbhajan Blames Dhoni) साथ दिली असेल, असे वक्तव्यही भज्जीनं केले. बीसीसीआयपेक्षा कॅप्टन मोठा नसतो, असे म्हणत त्याने धोनीवर ब्लेम करुन प्रेमही दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय.

हरभजन सिंगने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींवर दिलखुलास गप्पा केल्या. आपल्या कारकिर्दीतील संघर्षमयी काळासंदर्भात बोलताना तो म्हणाला की, बीसीसीआयच्या (BCCI) काही अधिकाऱ्यांनी मला संघाबाहेर काढले. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) त्यावेळी कर्णधार होता. ही गोष्ट धोनीच्या हाताबाहेरची होती. बीसीसीआय कॅप्टन, कोच आणि टीमपेक्षा मोठी आहे, असे सांगत त्याने बीसीसीआयसंदर्भातील खदखद बोलून दाखवली.

हेही वाचा: कधी कोणती वेळ येईल सांगता येत नाही, विराटच्या वाट्याला तेच आलं

धोनीप्रमाणे इतर खेळाडूंना बीसीसीआयकडून पाठिंबा मिळाला नाही. अन्य खेळाडू अचानक बॅटिंग किंवा बॉलिंग करायला विसरले असे नाही. जर त्यांना सपोर्ट मिळाला असता तर तेही टीम इंडियाकडून अधिक काळ खेळले असते, असेही भज्जीने यावेळी बोलून दाखवले. भज्जीने काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती त्याला मैदानातून निवृत्त होण्याच भाग्य लाभलं नाही. यावरही त्याने मनातील भावना व्यक्त केली. भारतीय संघाची जर्सी घालून निवृत्त व्हावे, असे प्रत्येक खेळाडूची भावना असते. पण प्रत्येकाला हे भाग्य लाभत नाही. व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविज, विरेंद्र सेहवाग यांनाही मैदानातून निवृत्ती घेण्याचे भाग्य लाभले नाही, असे सांगत आपणही त्यांच्या पक्तींत मोडतो, असेच काहीसे भज्जीने सांगितले.

हेही वाचा: Cristiano Ronaldo च्या नव्या वर्षाची सुरुवात नाराजीनं

भज्जीला अजूनही खेळण्याची इच्छा होती. ही गोष्टही त्याने मुलाखतीमध्ये बोलून दाखवली. 31 व्या वर्षी मी 400 विकेट्स घेतल्या होत्या. 4-5 वर्षे अजून खेळलो असतो. पण मला संघातून बाहेर करण्यात आले. कोणतेही कारण न देता संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. काही लोकांना मी विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: 'बाप बाप होता है'; ब्रेट लीचा खतरनाक यॉर्कर; व्हिडिओ व्हायरल

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top