हरभजनची मोठी घोषणा; सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

Harbhajan Singh
Harbhajan Singhesakal

भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने (Harbhajan Singh) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आज ( दि. २४) ट्विटरवरुन याची घोषणा केली.

हरभजन सिंगने १७ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याने ऑस्ट्रेलिया सारख्या त्या काळात तगड्या समजल्या जाणाऱ्या संघाविरुद्ध मार्च १९९८ मध्ये बंगळुरुमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या कारकिर्दित १०३ कसोटी ४१७ कसोटी विकेट घेतल्या आहेत. कसोटीत भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे. हरभजनने (Harbhajan Singh) २३६ एकदिवसीय सामने खेळले असून त्याच्या नावावर २६९ विकेट्स आहेत. याचबरोबर त्याने भारताकडून २८ टी २० सामने खेळत २५ विकेट्स घेतल्या आहेत.

हरभजन सिंग (harbhajan singh) हा २००७ च्या टी २० वर्ल्डकप आणि २०११ एकदिवसीय संघाचा देखील भाग होता. हरभजन सिंग २००१ च्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर प्रकाशझोतात आला होता. मायदेशात झालेल्या या कसोटी मालिकेत त्याने आपल्या फिरकीने सर्वांना प्रभावित केले होते. याच मालिकेतील दुसऱ्या कसोटीत हॅट्ट्रिक नोंदवली होती. (Harbhajan Singh Announce Retirement)

Harbhajan Singh
Video: हरभजन अन् रसलची KKRच्या ड्रेसिंग रूममध्ये धमाल मस्ती!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com